उस्मानाबादकरांना मोठा दिलासा! उजनी धरणातून वाढीव पाणी आरक्षण मंजूर; समांतर पाणी योजनेचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:49 PM2022-05-24T19:49:16+5:302022-05-24T19:50:04+5:30

उस्मानाबाद-उजनी समांतर पाणी याेजनेच्या मार्गातील माेठा अडथळा या माध्यमातून आता दूर झाला आहे.

Great relief to Osmanabadkars! Approved increased water reservation from Ujani dam; Pave the way for a parallel water scheme | उस्मानाबादकरांना मोठा दिलासा! उजनी धरणातून वाढीव पाणी आरक्षण मंजूर; समांतर पाणी योजनेचा मार्ग मोकळा

उस्मानाबादकरांना मोठा दिलासा! उजनी धरणातून वाढीव पाणी आरक्षण मंजूर; समांतर पाणी योजनेचा मार्ग मोकळा

googlenewsNext

उस्मानाबाद: शहरासाठी २०१३ पासून उजनी धरनातून पिण्यासाठी पाणी आणले जाते. परंतु, हे पाणी शहरासाठी पुरेसे नव्हते. समांतर याेजना राबवायची म्हटले तर उजनी धरणातील पाणी आरक्षणाचा अडथळा येत हाेता. हा मुख्य अडथळा दूर व्हावा, यासाठी पाणी आरक्षण वाढून मिळावे, म्हणून पालिकेकडून प्रस्ताव पाठविण्यात आला हाेता. सततच्या प्रयत्नानंतर पूर्वीचे ६.६२२ आणि नवीन १५.५८८ मिळून आता २०.३९० दलघमी पाणी आरक्षण मंजूर झाले आहे. त्यामुळे आता उजनी-उस्मानाबाद समांतर पाणी याेजनेचा मार्ग माेकळा झाला आहे.

साधारपणे २०१६ मध्ये अटल अमृत योजनेच्या माध्यमातून उजनी धरणावरून दुप्पट क्षमतेने पाणी आणण्यासाठी जुन्या याेजनेचे अपग्रेडेशन करण्यात आले. त्यामुळे याेजनेची क्षमता ८ एमएलडीवरून १६ एमएलडी झाली. परंतु, हे करताना तत्कालीन सरकारने शहरासाठी २०२१ ची लोकसंख्या गृहित धरुन २६ एमएलडी (उजनी १६ तर तेरणा व रूईभर धरणावरून प्रत्येकी ५ एमलडी) पाण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार याेजना मिळाली. परंतु, तेरणा तसेच रूईभर ही दाेन्ही धरणे दुष्काळ पडला की काेरडी पडतात. त्यामुळे शहराला गरजेपेक्षा १० एमएलडी पाणी कमी मिळत हाेते. आणि उजनी धरणातून ही गरज भागवायचे म्हटले तर ६.५ दलघमी पाणी आरक्षणामुळे मर्यादा येत हाेती. माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर तांत्रिक बाबींचा अभ्यास करून तसा प्रस्ताव तयार केला.

दरम्यानच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे मराठवाड्याच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक झाली. याच बैठकीत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पाणी आरक्षण वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी संबंधितांना मागणीच्या अनुषंगाने कार्यवाहीचे आदेश दिले हाेते. यानंतर थाेडाही विलंब न करता नगर परिषदेची २९ डिसेंबर २०२० राेजी सभा घेऊन उजनी धरणात वाढीव पाणी आरक्षणाचा ठराव पारित करण्यात आला. तसेच कृष्णा-खाेरे मंडळाकडे रितसर प्रस्ताव दाखल केला. सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर २०५१ सालापर्यंत पुरेल एवढे २०.३९० दलघमी पाणी आरक्षण मंजूर झाले. त्यामुळे आता उजनी-उस्मानाबाद समांतर पाणी योजनेचा मार्ग मोकळा झाल आहे.

३०० काेटींचा डीपीआर तयार...
उजनी धरणातील पाणी आरक्षण २०.६२२ दलघमी एवढे झाले आहे. ही उस्मानाबादकरांसाठी माेठी आनंदाची बाब आहे. उस्मानाबाद-उजनी समांतर पाणी याेजनेच्या मार्गातील माेठा अडथळा या माध्यमातून आता दूर झाला आहे. यापूर्वीच समांतर पाणी याेजनेसाठीचा ३०० काेटींचा डीपीआर पालिकेकडून तयार करण्यात आला आहे. आता या डीपीआरला तांत्रिक मान्यता घेऊन अटल अमृत याेजना टप्पा-२ अथवा इतर काेणत्याही शासकीय याेजनेतून प्रशासकीय मान्यता घेता येऊ शकते. यानंतर तात्काळ याेजनेचे काम सुरू करून २०५२ सालापर्यंत लाणारे पाणी उस्मानाबादकरांना मिळेल. 
- मकरंद राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष,उस्मानाबाद

Web Title: Great relief to Osmanabadkars! Approved increased water reservation from Ujani dam; Pave the way for a parallel water scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.