ज्ञानदेव मोहेकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:33 AM2021-07-28T04:33:54+5:302021-07-28T04:33:54+5:30
मोहा : शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या जयंतीनिमित्त येथे त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च ...
मोहा : शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या जयंतीनिमित्त येथे त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य शरद खंदारे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर, विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा शालेय समिती सदस्य गौतम मडके, पर्यवेक्षक वाय. बी. सावंत, उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब मिटकरी, शालेय समिती सदस्या सुरेखा तांबारे, बी. एम. काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.आभार सतीश मडके यांनी मानले. तसेच मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन हनुमंत मडके, सरपंच राजू झोरी, कार्यकारी संचालक विशाल मडके, मुख्य कार्यालय अधिकारी प्रमोद मडके, श्रीकांत मडके, अतुल मडके, इम्रान शेख, सूरज मडके, राहुल मडके, आदी उपस्थित होते
270721\20210727_090812.jpg
मोहा - शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि.मोहा या संस्थे मध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ( गुरुजी ) आण्णा यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी संस्थेचे चेअरमन हनुमंत मडके, सरपंच राजु झोरी, कार्यकारी संचालक विशाल मडके , मुख्य कार्यालय अधिकारी प्रमोद मडके, श्रीकांत मडके, आतुल मडके, इम्रान शेख,सुरज मडके ,राहुल मडके, तसेच शाखाधिकारी , कर्मचारी ,सभासद आदी उपस्थित होते