नेताजी सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:12 AM2021-02-05T08:12:42+5:302021-02-05T08:12:42+5:30
छत्रपती शिवाजी हायस्कूल, उमरगा उमरगा : येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रतिमा पूजन व व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी ...
छत्रपती शिवाजी हायस्कूल, उमरगा
उमरगा : येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रतिमा पूजन व व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डी. व्हि. थोरे, डॉ. गिरीधर सोमवंशी, उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले, डॉ. विलास इंगळे, पर्यवेक्षक प्रा. शैलेश महामुनी, डॉ. डी. बी. ढोबळे, प्रा. एस. डी. गावित, डॉ. पी. एल. सावंत, प्रा. सुरज सूर्यवंशी, डॉ. ए. एस. शिंदे, डॉ. आर. आर. नितनवरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. डी. एस. बिराजदार यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. विनोद देवरकर यांनी केले. प्रा. सतीश गावित यांनी आभार मानले.
नंदूराम आश्रमशाळा
बलसूर : येथील नंदूराम प्राथमिक आश्रमशाळेत राणाप्रताप जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भारत कांबळे, हरी लवटे, श्रीनिवास साळुंखे, रोहिदास जाधव, अनिल चव्हाण, जनाबाई चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य एस. आर. मारेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक एस. व्ही. औरादे, प्रा. एम. व्ही. कांबळे, एम. डी. काळे, गुरुलींग वाकडे, सुरेश रोहिने, जयचंद्र जाधव, विश्वजीत बिराजदार, प्रा. दत्ता राठोड, प्रा. संजय गुजरे, अनुसया भाले आदी उपस्थित होते. जकेकूर येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय डोंगरे, मुख्याध्यापक व्ही. टी. घोडके, सहशिक्षक प्रदीप समाने, संजय बिराजदार, संतोष कांबळे, संतोष बिराजदार, पटेल नासीर, मल्लीनाथ स्वामी उपस्थित होते.
शिवसेना कार्यालय, उमरगा
उमरगा : येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खा. प्रा. रवींद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, जितेंद्र शिंदे, सभापती मोहयोद्दीन सुलतान, उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, उपतालुका प्रमुख सुधाकर पाटील, नरेंद्र माने, शरद पवार, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, पंचायत समित सदस्य बसवराज शिंदे, विजयकुमार नागणे, विभागप्रमुख खय्यूम चाकूरे, लिंगराज स्वामी, विलास भगत, प्रदीप शिवणेचारी, दत्ता डोंगरे, आप्पाराव गायकवाड, भगत माळी, योगेश शिंदे, करणसिंग पवार, विनोद मुसांडे, हणमंत शिंदे, केसरजवळगा सरपंच अमोल पटवारी, विजय भोसले, बालाजी बनसोडे, राजू कारभारी, कमलाकर निकम, आदी उपस्थित होते.
हनुमान चाैक, ढोकी
ढोकी : येथील हनुमान चौकात नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, पोलीसपाटील राहुल वाकुरे, भारत देशमुख, पांडुरंग वाकुरे, समद शेख, मुख्तार पटेल, महेबूबहुसेन कुरेशी, इलाही वस्ताद, फरीद तांबोळी, मुसा शेख, शेखचांद वस्ताद, शेखामत तांबोळी, भैरवनाथ माळी, गुणवंत देशमुख, पांडुरंग माळी, शाकेर शेख, संतोष कंदले, पंकज देशपांडे, पवन कोळी, दत्ता साळुंके, विकास देशपांडे उपस्थित होते.
शिंदे महाविद्यालय, परंडा
परंडा : येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राचार्या डाॅ. दीपा सावळे, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, प्रा. डॉ. सचिन चव्हाण, प्रा. सचिन साबळे, प्रा. डॉ. संभाजी गाते, प्रा. डॉ. अरूण खर्डे, प्रा. डॉ. कृष्णा परभणे, प्रा. डॉ. बाळासाहेब राऊत, प्रा. दीपक तोडकरी, प्रा. विद्याधर नलवडे आदी उपस्थित होते.