संत गाडगेबाबा यांना जिल्ह्यात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:34 AM2021-02-24T04:34:00+5:302021-02-24T04:34:00+5:30

उस्मानाबाद : शहरासह जिल्हाभरात मंगळवारी थोर समाजसुधारक गाडगेबाबा यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह ...

Greetings to Saint Gadge Baba in the district | संत गाडगेबाबा यांना जिल्ह्यात अभिवादन

संत गाडगेबाबा यांना जिल्ह्यात अभिवादन

googlenewsNext

उस्मानाबाद : शहरासह जिल्हाभरात मंगळवारी थोर समाजसुधारक गाडगेबाबा यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयात तसेच विविध संस्था-संघटनांकडून गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय

उस्मानाबाद : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी आंधळे, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक कुलकर्णी, वाघमारे, अव्वल कारकून मोरे, देवकर, नरसिंह ढवळे, चव्हाण, गायकवाड, केंद्रे, चौधरी, महसूल सहायक गजभार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषद

उस्मानाबाद : येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा अस्मिता कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी पाणी स्वच्छता मिशन विभागातील हनुमंत घाडगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दाताळ, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, जिल्हा जलसंधारण अधिकारी जोशी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देवकर आदी उपस्थित होते.

चव्हाण महाविद्यालय

फोटो (२३-२) बालाजी बिराजदार

लोहारा : शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात प्राचार्य वीरभद्रेश्वर स्वामी व प्रा. विनोद तुंगे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. स्वाती निकम, स्नेहलता करदुरे, अनिता पवार, अमृता दीक्षित, राजपाल वाघमारे, अरविंद हंगरगेकर, वैशाली जाधव, प्रियंका वचने पाटील, मधुमती पाटील, रूपाली विरोधे, सारिका पतंगे, शकुंतला बिराजदार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

(फोटो - 23)

नालंदा बुद्धविहार

तुळजापूर : तालुक्यातील कुंभारी येथील दिलपाक प्रतिष्ठान संचालित नालंदा बुद्धविहारमध्ये संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष वडने, बालाजी दिलपाक, गौतम दिलपाक, ज्ञानेश्वर दिलपाक, मनोज दिलपाक, संतोष दिलपाक, अमोल दिलपाक, शिवाजी पारधे, तात्यासाहेब पारधे, अर्पिता पारधे आदी उपस्थित होते.

संत गाडगे महाराज अनाथाश्रम

(फोटो - 23)

कळंब : शहरातील श्री संत गाडगे महाराज अनाथ आश्रम येथे सतपाल बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास राहुल हौसलमल, वाजीद काझी, सिद्धार्थ वाघमारे, अजय पारवे, अभिषेक पवार, रोहित चव्हाण, राजपाल गायकवाड, संचालक रवि शिंदे आदी उपस्थित होते.

विद्यानिकेतन आश्रमशाळा

उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळेत सांस्कृतिक विभागप्रमुख आर. बी. पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमास प्राथमिकचे मुख्याध्यापक शिंदे, माध्यमिक मुख्याध्यापक राठोड, पर्यवेक्षक शेख, शानिमे, पडवळ, खबोले यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

(फोटो-23)

मस्सा ग्रामपंचायत

मस्सा (खं.) : कळंब तालुक्यातील मस्सा (खं.) येथील ग्रामपंचायत कार्यालयात लिपिक हरिआप्पा तावस्कर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी सदस्य अक्षय माळी, बब्रुवान गोरे, मनोजकुमार थोरात, संभाजी चौगुले, गणपत परीट, बळीराम चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

साई संगणकशास्र महाविद्यालय

कळंब : तालुक्यातील रांजणी येथील साई संगणक शास्र महाविद्यालयात प्राचार्य जगदीश गवळी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा.एस डी. कुपकर, प्रा. एन. एम. चाऊस, प्रा. ए.डी. जाधव, प्राध्यापिका एस. यू. भारजकर, एस.आय. शेख, डी. एल. शेळके, पी. बी. गायकवाड, बी. डी. लांडगे आदी उपस्थित होते.

कोळेगावात अभिवादन

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील काळेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते एस. के. गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमास उपसरपंच आनंदराव पाटील, ग्रामसेविका टी.ए. शेख, ग्रामपंचायत सदस्य विशाल मुळे, शिवाजी नाईक, शाखा आभियंता जी. जी. बिराजदार, नागेश भोवाळ, गोविंद मुळे, अमोल आकोस्कर, शाम काटवटे आदी उपस्थित होते.

शिंदे महाविद्यालय

परांडा : येथील शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयत प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, प्रा. विद्याधर नलवडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. डॉ. महेशकुमार माने, डॉ. प्रकाश सरवदे, डाॅ. अक्षय घुमरे, प्रा. संतोष काळे, सचिन चव्हाण, अनिल जानराव यावेळी उपस्थित होते.

(फक्त कॅप्शन 23)

कळंब तालुक्यातील मस्सा (खं) येथे परीट समाजाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बब्रुवान गोरे, संभाजी चौगुले, बळीराम चौगुले, मनोजकुमार थोरात, दत्तू चौगुले, राम गोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Greetings to Saint Gadge Baba in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.