गीतगायनातून सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:27 AM2021-01-04T04:27:21+5:302021-01-04T04:27:21+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील अंगणवाडी क्रमांक ८०३ येथे बालिका दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी चिमुकल्या बालिकांनी सावित्रीबाईंच्या ...
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील अंगणवाडी क्रमांक ८०३ येथे बालिका दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी चिमुकल्या बालिकांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित गीत सादर करून मनोगत व्यक्त केले. यावेळी अंगणवाडी कार्यकर्ती इंदूबाई शेळके, वैशाली वाघमारे, सुमित्रा साळुंके यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
ग्रामपंचायत कार्यालय मस्सा (खं.)
मस्सा (खं.) : कळंब तालुक्यातील मस्सा (खं.) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रा. राजश्री वरपे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य अक्षय माळी, दत्तात्रय सावंत, तंटामुक्त अध्यक्ष विक्रम वरपे, नितीन सावंत, बब्रुवान गोरे, संतोष माळी, लिपिक हरी तावस्कर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जयप्रकाश विद्यालय, रुईभर
उस्मानाबाद : तालुक्यातील रुईभर येथील जयप्रकाश माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका शिवकन्या साळुंके यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष सुभाष कोळगे, रामदास कोळगे, राजनारायण कोळगे, सरपंच दत्तात्रय कस्पटे, उपसरपंच बालाजी कोळगे, प्रा. जयप्रकाश कोळगे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक के. ए. डोंगरे, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, सचिन कांबळे उपस्थित होते.