सावित्रीमाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:56 AM2021-03-13T04:56:58+5:302021-03-13T04:56:58+5:30

उस्मानाबाद : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना, शासकीय-निमशासकीय कार्यालयात प्रतिमापूजन ...

Greetings to Savitrimai Phule on the occasion of Memorial Day | सावित्रीमाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

सावित्रीमाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

googlenewsNext

उस्मानाबाद : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना, शासकीय-निमशासकीय कार्यालयात प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

(फोटो : फुले चौक ओबीडी ११)

यानिमित्त येथील महात्मा फुले चौकात सावित्री युवराज बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादेव माळी, युवराज बनसोडे, नितीन तावडे, काकासाहेब कांबळे, नेताजी धोंगडे, नामदेव वाघमारे, चंद्रशेखर सुरवसे, रॉबिन बगाडे, सचिन चौधरी, मुकेश नायगावकर, संतोष भोजने, अशोक वाघमारे, अमोल माळी, किशोर माळी आदी उपस्थित होते.

शिंगोली आश्रमशाळा

उस्मानाबाद : तालुक्यातील शिंगोली येथील विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व आदर्श प्राथमिक आश्रमशाळेत सहावीच्या विद्यार्थिनींनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी माध्यमिकचे पर्यवेक्षक शेख, मुख्याध्यापक शिंदे, सांस्कृतिक विभागप्रमुख आर. बी. पाटील, शानिमे, व्यवहारे व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

जयप्रकाश विद्यालय

(फोटो : जयप्रकाश स्कूल ११)

उस्मानाबाद : तालुक्यातील रूईभर येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका शिवकन्या सांळुके यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार व श्रीफल अर्पण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष कोळगे, माजी जि. प. सदस्य रामदास कोळगे, तालुका शिवसेना उपप्रमुख राजनारायण कोळगे, सरपंच दत्तात्रय कस्पटे, उपसरपंच बालाजी कोळगे, प्रा. जयप्रकाश कोळगे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक के. ए. डोंगरे, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, आदी उपस्थित होते. आभार विनय सारंग यांनी मानले.

संविधान न्याय-अधिकार संवर्धन संघर्ष समिती

(फोटो : ओबीडी फोटो ११)

उस्मानाबाद : येथील संविधान न्याय-अधिकार संवर्धन संघर्ष समितीच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव व नागेश लोंढे यांच्या हस्ते पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रंजित गायकवाड, विजय बनसोडे, अतुल लष्करे, बी. डी. बनसोडे, शिवाजी शिंदे, मुकुश मोटे, रिपब्लिकन सेनेचे स्वप्नील शिंगाडे, पेंटर युनियनचे बाबासाहेब कांबळे, सुभाष शिंदे, अतुल बनसोडे, कामगार नेते महादेव एडके, महादेव भोसले आदी उपस्थित होते.

शेंडगे महाविद्यालय

(फोटो : शेंडगे कॉलेज ११)

उमरगा : येथील डॉ. के. डी. शेंडगे महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डी. पी. चंदिले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा. एल. एम. जाधव, प्रा. जी. टी. ब्याळे, प्रा. एल. एम. कांबळे, प्रा. पी. डी. कांबळे, प्रा. पी. डी. पवार, प्रा. पी. एम. राठोड, प्रा. एस. एस. कुडवकवलगे, प्रा. एम. के. मुजावर, प्रा. एस. एस. सुरवसे, प्रा. एम. एस. दुधभाते, प्रा. पाटील, पी. यू. माने आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Savitrimai Phule on the occasion of Memorial Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.