‘कृषी’कडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:24 AM2021-06-04T04:24:55+5:302021-06-04T04:24:55+5:30

कार्यवाहीची मागणी उस्मानाबाद : जिल्ह्यात अनेक ठिकाणी उघड्या डीपी, लोंबकळणाऱ्या तारा व विजेशी संबंधित इतर अनेक समस्या आहेत. त्यामुळे ...

Guidance from ‘Agriculture’ | ‘कृषी’कडून मार्गदर्शन

‘कृषी’कडून मार्गदर्शन

googlenewsNext

कार्यवाहीची मागणी

उस्मानाबाद : जिल्ह्यात अनेक ठिकाणी उघड्या डीपी, लोंबकळणाऱ्या तारा व विजेशी संबंधित इतर अनेक समस्या आहेत. त्यामुळे महावितरणने याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

दारू जप्त

उस्मानाबाद : बेंबळी पोलीस ठाण्याच्या पथकाने १ जून रोजी तालुक्यातील केशेगाव शिवारात छापा टाकला. यावेळी रामेश्वर विठोबा सातपुते हे गावठी दारूसह मिळून आले. त्यांच्या विरुध्द बेंबळी ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

त्रिकोळीत छापा

उमरगा : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने १ जून रोजी त्रिकोळी येथे छापा टाकला. यावेळी जयराम सुरवसे यांच्याकडे देशी दारू मिळून आली. त्यांच्याविरुध्द उमरगा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

संसर्गाचा धोका

परंडा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु, बहुतांश नागरिक विनामास्क कामाशिवाय बाहेर फिरताना दिसत आहेत. यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे.

श्वान, वराहांमुळे शहरवासीय त्रस्त

उस्मानाबाद : एकीकडे जागतिक कोविड १९ महामारीमुळे जनता त्रस्त असताना उस्मानाबाद शहरात मोकाट श्वान व वराह यांनी उच्छाद मांडला आहे. यामुळे शहरवासीय त्रस्त आहेत. पावसाळी काळात घाणीचे व रोगराईची शक्यता नाकारता येत नाही. निवासी वसाहतीत वयोवृध्द, लहान मुलांना श्वानांनी चावा घेण्याची शक्यता असते. यामुळे भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. हे श्वान रात्रीच्या वेळी मोठेमोठ्याने ओरडत, रडत असल्याने नागरिकांत भीती निर्माण होत आहे. या बाबत प्राणिमित्र, नगर परिषद यांनी लक्ष देऊन तत्काळ हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Guidance from ‘Agriculture’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.