ई -पीक पाहणीबाबत दाळींब येथे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:37 AM2021-09-12T04:37:29+5:302021-09-12T04:37:29+5:30
महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, माझा ...
महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा’ या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याच्या उपक्रमास १५ ऑगस्टपासून सुरुवात झाली. परंतु, ग्रामीण भागात या ॲपसंदर्भात शेतकरी संभ्रमात होते. यासाठी तलाठी हे गावा-गावात जावून शेतकऱ्यांना ई-पीक पहाणीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला पीक पाहणी ॲपचा वापर करावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदी घेण्यास शेतकऱ्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. सातबारा उताऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिकांच्या नोंद करण्याचे आवाहन तलाठी गजेंद्र पाटील यांनी यावेळी केले. तसेच त्याचे प्रात्यक्षिकही करवून घेतले. यावेळी शिवानंद टिकांबरे, आसलम शेडमवाले, आमिर मुल्ला, मुनिर बिराजदार, हबीब मिरासे, बाळू राठोड आदी उपस्थित होते.