महिला शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:59+5:302021-04-03T04:28:59+5:30
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, सरपंच सुरेखा अनंत गोरे यांनी सेंद्रिय ...
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, सरपंच सुरेखा अनंत गोरे यांनी सेंद्रिय निविष्ठांची पाहणी करून उपस्थित महिला शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी महिला यांना पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी किरण निंबाळकर यांनी बायोगॅस आणि विहीर योजनेची माहिती दिली.
आजपर्यंत तालुक्यातील २७ गावांमध्ये २० सेंद्रिय शेतकरी गट कार्यरत असून, सेंद्रिय शेती करत आहेत. कार्यशाळेत तालुका समन्वयक नरेंद्र गवळी यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. माती परीक्षण, उगवणक्षमता, बीजप्रक्रिया करून घरचे बियाणे पेरणी करावी तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी सेंद्रिय निविष्ठा दशपर्णी अर्क, जिवामृत, वेस्ट डी कंपोजर, अग्निअस्त्र, व्हर्मी वॉश, रंगीत सापळे, कामगंध सापळे, गांडूळ खत आदी सेंद्रिय निविष्ठांचा वापर कसा करावा, याची माहिती गवळी यांनी दिली. तसेच प्रभाग समन्वयक प्रदीप चव्हाण, शिवशंकर कांबळे, कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर, सचिन गायकवाड यांनी सेंद्रिय निविष्ठा प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यशाळेचा महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद बीडबाग यांनी केले. सौरभ जगताप यांनी आभार मानले.