कोळसूर येथे गांडूळ खत, उत्पादक गटाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:29 AM2021-04-03T04:29:01+5:302021-04-03T04:29:01+5:30
अध्यक्षस्थानी सरपंच सविता शिरसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहायक एस. बी. आरेकर, उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, प्रभाग ...
अध्यक्षस्थानी सरपंच सविता शिरसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सहायक एस. बी. आरेकर, उमेद कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, प्रभाग समन्वयक धनाजी गोरे, प्रभाग कृषी व्यवस्थापक महेश ढोणे, नागनाथ शिरसे, समूह सहायक अभिजित मडके, ग्रामसेवक व्ही. एस. माने आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतीशाळेत आरेकर यांनी बीज उगवण क्षमता डेमो करून दाखविला. त्यानंतर किशोर औरादे यांनी सेंद्रिय शेती व खरीपपूर्व नियोजन, माती परीक्षण, पाणी परीक्षण, गांडूळ खत व उत्पादक गट याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन राहुल वार यांनी, तर आभार साक्षी मगे यांनी मानले. कार्यशाळेसाठी ममता माळी, सुनीता सूर्यवंशी, पूजा सूर्यवंशी, प्रियंका सूर्यवंशी, वर्षा सूर्यवंशी, सीआरपी मगे, कृषी सखी कांबळे आदींनी पुढाकार घेतला.