एलएमएस प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:31 AM2021-03-20T04:31:07+5:302021-03-20T04:31:07+5:30

यासाठी तेरणा ट्रस्टचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रा. अमोल चव्हाण, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जयशंकर ...

Guide students through the LMS system | एलएमएस प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एलएमएस प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

googlenewsNext

यासाठी तेरणा ट्रस्टचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर प्रा. अमोल चव्हाण, प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जयशंकर तरुण यांनी या तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. सूत्रसंचालन विजयपाल यादव यांनी केले. यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, प्रा. उषा वडणे, प्रा. उदय मस्के, प्रा. अर्जुन यादव, प्रा. योगिता अजमेरा, प्रा. बालाजी चव्हाण, प्रा. मनोज जोशी आदी हजर होते.

पोषण आहार पंधरवडा उपक्रम

परंडा : येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत १६ ते ३१ मार्च या कालावधीत पोषण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आसू येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच अनिता राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अंगणवाडी सेविका ए. पी. माळी, आर. एस. शिंदे, एस.एच. पवार, मदतनीस एस. एल. खरात, व्ही. बी. देवकते, जे. डी. यशवाद आदींनी विविध मिश्र पिठाच्या पोषण पाककृती सादर केल्या.

‘अक्षर भारती’कडून स्कूल बॅगचे वाटप

परंडा : पुणे येथील अक्षर भारती सेवाभावी संस्थेच्या सहकार्यातून तालुक्यातील भोंजा हवेली जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी अक्षर भारतीचे जिल्हा समन्वयक विनोद सुरवसे, शालेय समिती अध्यक्ष श्रीराम भांदुर्गे, उमेदचे लघु उद्योग सल्लागार गणेश नेटके, मुख्याध्यापक हनुमंत पाटील, आदिकराव शेळवणे आदी उपस्थित होते.

रस्त्याची दुरवस्था

तुळजापूर : येथील तुळजापूर (खुर्द) पासून केशेगावकडे जाणाऱ्या पुलाची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, त्याच्या दुरुस्तीची मागणी वाहनधारकांमधून करण्यात येत आहे.

एकाविरुद्ध गुन्हा

उस्मानाबाद : भूम पोलिसांच्या छाप्यात तेथील मयूर पवार याच्याजवळ कल्याण मटका जुगार साहित्य व ३४० रुपये आढळून आले. पोलिसांनी जुगार साहित्य रक्कम जप्त करुन संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद केला.

Web Title: Guide students through the LMS system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.