तेली संघटनेकडून गुरूजनांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:38 AM2021-09-14T04:38:45+5:302021-09-14T04:38:45+5:30

यावेळी उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा, कळंब, वाशी, भूम व परंडा तालुक्यातील एकूण ४६ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष ...

Gurujan honored by Teli Association | तेली संघटनेकडून गुरूजनांचा सन्मान

तेली संघटनेकडून गुरूजनांचा सन्मान

googlenewsNext

यावेळी उस्मानाबाद, तुळजापूर, लोहारा, उमरगा, कळंब, वाशी, भूम व परंडा तालुक्यातील एकूण ४६ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी शिक्षक हा राष्ट्रनिमिर्तीतील मूलभूत घटक असल्याचे सांगून त्यांचा गुणगौरव झालाच पाहिजे, असे मत व्यक्त केले.

प्रारंभी तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर रवी कोरे यांनी प्रास्ताविकात तेली समाजाच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन सचिन राऊत यांनी केले. कार्यक्रमास जि. प. सदस्य नितीन शेरखाने, समता परिषदेचे राज्य सरचिटणीस आबासाहेब खोत, तेली समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, सचिव ॲड. विशाल साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, प्राचार्य अनिल देशमाने, दत्ता बेगमपुरे, शिवलिंग होनखांबे, चंद्रकांत मेंगले, कलशेट्टी अशोक चिंचकर, भीमाशंकर डोकडे, नागेश निर्मळे, सूर्यकांत चौधरी, दीपक नाईक, संजोग पवार, दीपक पवार, जितेंद्र घोडके, कपिल नवगिरे आदींची उपस्थिती होती.

चौकट.......

शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे कमीच

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्या भाषणात शिक्षकांचे कौतुक केले. शेतकरी, शेतमजूर, सामान्य लोकांची मुलं घडविण्याचे काम जिल्हा परिषदेच्या शाळेतून हे शिक्षक करीत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे ते म्हणाले. जि. प. शाळेतील शिक्षक हे मेरिट व गुणवत्ता पारखूनच निवडले जातात. आई, वडिलांनंतर मुलांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोलाचे असते, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Gurujan honored by Teli Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.