तुफान गारपीठीने शेती उद्धवस्त, १८ तासानंतरही गारा तशाच; शेतकरी मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2023 03:12 PM2023-04-09T15:12:38+5:302023-04-09T15:15:01+5:30
आंबा मिरचीची खाली सफचंद झाली तर, डोक्याइतका उंच उस गुडघ्या पर्यंत खाली आला आहे.
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याच्या शिराढोण परीसरातील हंगणगांव, दाभा, काळे सावरगाव, लोहटा या मांजरा धरण परिसरात शनिवारी तुफान गारपीटीने प्रचंड नुकसान झाले आहे. या गारा एवढ्या मोठ्या होत्या की, तब्बल १८ तासानंतर सुद्धा त्या काही प्रमाणात तशाच होत्या. पत्र्याला भोकं पडली तर जनावराची कातडी सोलली आहे.
झाडाला पालाही राहिला नाही. आंबा मिरचीची खाली सफचंद झाली तर, डोक्याइतका उंच उस गुडघ्या पर्यंत खाली आला आहे. शिमला मिरचीची केवळ राहिली. शेतकरी पुरता हवालदील झाला असून पंचनामे करून शासनाने तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.