लाेहार्यातील हार्डवेअरचे दुकान फाेडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:32 AM2021-03-10T04:32:11+5:302021-03-10T04:32:11+5:30
लोहारा : लोहारा शहरातील एसबीआय बँकेच्या शेजारी असलेल्या हार्डवेअर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार हजार रूपये लंपास केले. ...
लोहारा : लोहारा शहरातील एसबीआय बँकेच्या शेजारी असलेल्या हार्डवेअर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेचार हजार रूपये लंपास केले. त्याचबरोबर सोन्या-चांदीची दोन दुकाने फोडण्याचाही प्रयत्न झाला.
लोहारा शहरातील एसबीआय बॅकेच्या बाजूला बालाजी बिराजदार यांचे मातोश्री हार्डवेअर हे दुकान आहे. बिराजदार हे सोमवारी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश केला. यानंतर गल्ल्यातील रोख साडेचार हजार रुपये लंपास केले. मंगळवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर बिराजदार यांना शटर उघडे असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांंना संपर्क करुन माहीती दिली. यानंतर पाेलीस हवलदार एच. एम. पापुलवार यांनी घटनास्थळास भेट देऊन दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. एक चोरटा तोंडाला रुमाल बांधून गल्ल्यातील पैसे घेत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील श्री जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्सचे कुलूप ताेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलूप न तुटल्याने चोरीचा प्रयत्न फसला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कानेगाव रस्त्यावरील बालाजी ज्वलर्स हे दुकान फाेडीचाही प्रयत्न झाला. यासंदर्भात सुवर्णकार असोसिशनच्या वतीने पाेलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांना निवेदन देऊन रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.