शेतकऱ्यांचे ५७ हजार रुपये चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:12 AM2021-02-05T08:12:48+5:302021-02-05T08:12:48+5:30

परंडा तालुक्यातील हिंगणगाव येथील पांडुरंग मारुती गायकवाड यांनी आपल्या घरातील कपाटात रोख ५७ हजार रुपये ठेवले होते. १ ...

He stole Rs 57,000 from farmers | शेतकऱ्यांचे ५७ हजार रुपये चोरले

शेतकऱ्यांचे ५७ हजार रुपये चोरले

googlenewsNext

परंडा तालुक्यातील हिंगणगाव येथील पांडुरंग मारुती गायकवाड यांनी आपल्या घरातील कपाटात रोख ५७ हजार रुपये ठेवले होते. १ फेब्रुवारी रोजी ते संपूर्ण कुटुंबीयांसह नेहमीप्रमाणे आपल्या शेतात सकाळी कामासाठी गेले होते. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शेताहून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटात पाहिले असता, त्यातील ५७ हजारांची रोकडही गायब दिसली. यानंतर त्यांनी आंबी पोलिसांकडे धाव घेऊन चोरीची तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण करून तरुणीवर अत्याचार

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुणीवर तिच्या नात्यातीलच एका तरुणाने अत्याचार केल्याची घटना नुकतीच उजेडात आली आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधित तरुणावर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या एका २३ वर्षीय तरुणीवर तिच्याच नात्यातील व अन्य जिल्ह्यात वास्तव्य करीत असलेल्या तरुणाने अत्याचार केला आहे. २७ जानेवारी रोजी हा तरुण ती राहत असलेल्या वस्तीवर आला व तरुणीचे अपहरण करून आपल्या गावी नेले. येथे स्वत:च्याच घरी तिला डांबून ठेवून लैंगिक अत्याचार केला, तसेच या काळात मारहाण करून तरुणीला या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारु, अशी धमकीही आरोपी तरुणाने दिली. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: He stole Rs 57,000 from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.