उसाच्या फडात नेऊन महिलेवर केला अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:37 AM2021-08-21T04:37:35+5:302021-08-21T04:37:35+5:30
एक ३० वर्षीय महिला ही १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात काम करीत होती. यावेळी शेजारच्या ...
एक ३० वर्षीय महिला ही १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात काम करीत होती. यावेळी शेजारच्या गावातील एक पुरुष त्याठिकाणी गेला. काम करणा-या महिलेस जबरदस्तीने पकडून लगतच्या उसाच्या फडात नेले. तेथे धमकी देत या पुरुषाने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास महिलेस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत तक्रार केली नाही. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी पुन्हा त्याच पुरुषाने असा प्रयत्न केला. पीडित महिला शेतात काम करताना तो पुन्हा जवळ येऊन लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करू लागला. महिलेने प्रतिकार केला असता तिला जबर मारहाण करून पतीस ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठून गुरुवारी आरोपीविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार, अत्याचार व ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.