न्यायालयाच्या आवारात माथेफिरूचा धुडगूस
By Admin | Published: July 6, 2017 05:19 PM2017-07-06T17:19:07+5:302017-07-06T17:25:06+5:30
हातात कोयता व दोरी घेऊन एका माथेफिरुने न्यायालयाच्या आवारात दुपारी धुडगूस घालत वकिलांना शिवीगाळ केली़.
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद : हातात कोयता व दोरी घेऊन एका माथेफिरुने न्यायालयाच्या आवारात दुपारी धुडगूस घालत वकिलांना शिवीगाळ केली़. यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याच्या कडील कोयता काढून घेत त्याला ताब्यात घेतले़.
जिल्हा न्यायालयाच्या आवारात दुपारी अचानक एक माथेफिरु हातात कोयता व दोरी घेऊन शिरला़. आवारात उभे राहत त्याने वकिलांना शिवीगाळ सुरू केली़. त्याच हे रूप व हातातील कोयता पाहून उपस्थितांची भितीने गाळण उडाली़. याचवेळी न्यायालयीन कामानिमित्त शहर पोलीस ठाण्याचे पोनि डी़. एम़. शेख आले होते . काही कर्मचाºयांच्या मदतीने त्यांनी त्या माथेफिरुस शिताफीने ताब्यात घेतले़. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव जग्गू छम्या काळे (रा़ ढोकी कारखाना ता़. उस्मानाबाद) असल्याचे सांगितले़ . आनंदनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याचे कलम (४) २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे़.
नातेवाईकांशी वाद ?