‘राेटरी’च्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:23 AM2020-12-27T04:23:57+5:302020-12-27T04:23:57+5:30
उमरगा : तालुक्यातील जकेकूरवाडी येथे राजे शिवाजी रोटरॅक्ट क्लब व जिजाऊ रोटरॅक्ट क्लबच्या वतीने एक दिवसीय आरोग्य तपासणी ...
उमरगा : तालुक्यातील जकेकूरवाडी येथे राजे शिवाजी रोटरॅक्ट क्लब व जिजाऊ रोटरॅक्ट क्लबच्या वतीने एक दिवसीय आरोग्य तपासणी २६ डिसेंबर राेजी घेण्यात आले.
रोटरी क्लबच्या अध्यक्ष कविता अस्वले आणि सचिव अनिल मदनसुरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी डाॅ. नजीर शेख व डाॅ. स्नेहल अस्वले यांनी १४२ लोकांची तपासणी करून त्यांना उपचार विषयक समुपदेशन केले. दुसऱ्या सत्रात ‘महिलांच्या शारीरिक व मानसिक समस्या’ या विषयावर डॉ. शशी कानडे यांनी तर महिलांनी तंदुरुस्त राहण्यासाठी करावयाचा व्यायाम व आहार यावर डॉ. मीनाक्षी डिग्गीकर तसेच सुबक, सुंदर दातांसाठी काय करावे, याबाबत डॉ. स्नेहल अस्वले यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन जिजाऊ रोटरॅक्टचे उपाध्यक्ष पल्लवी जगताप यांनी केले. आभार बबिता जगताप यांनी मानले. या शिबिरासाठी रोटरॅक्टचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी, सचिव अमित रेड्डी, उपाध्यक्ष संदिप जगताप, हरिदास भोसले, माधव गायकवाड, राम सूर्यवंशी, बाबुराव चिट्टे व बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेतला.