ग्रामीण उपकेंद्रास आरोग्य साहित्य भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:00+5:302021-04-29T04:24:00+5:30
जिल्हा तेली समाज संघटनेचा पुढाकार उस्मानाबाद : जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने तालुक्यातील आळणी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ...
जिल्हा तेली समाज संघटनेचा पुढाकार
उस्मानाबाद : जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने तालुक्यातील आळणी येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधित रुग्णांवरील उपचाराच्या दृष्टीने ग्रामीण उपकेंद्रास पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज, आदी साहित्य डॉ. ज्योती वडगावे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
आळणी येथे वाढती रुग्णसंख्या पाहता ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घेणाऱ्या आशा वर्कर, डॉक्टर व नर्स यांना ‘मदत नव्हे तर कर्तव्य’ या भावनेतून तेली समाज संघटनेकडुन ही मदत करण्यात आली. याप्रसंगी एएनएम टेकाळे, आशा वर्कर कालिंदा कदम, नंदा कदम, शोभा गायकवाड, युवराज चौगुले, राहुल पतंगे, लक्ष्मण तिंडे यांच्यासह तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्रीपाल वीर, सरपंच प्रमोद वीर, ग्रामपंचायत सदस्य विनोद लावंड, साजन कदम, ग्रामसेवक सुजय मैंदाड, पोलीस पाटील प्रमोद माळी, ग्रामरोजगार सेवक दादासाहेब गायकवाड, शाखा प्रमुख अजित वीर, सुनील माळी, प्रसाद वीर, शरद लावंड, बबलू वीर यांची उपस्थिती होती.