पिंपळा गावास आरोग्य पथकाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:29+5:302021-04-25T04:32:29+5:30

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) गावात आतापर्यंत १४ कोरोना रूग्ण आढळून आले असून, तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ...

Health team visits Pimpala village | पिंपळा गावास आरोग्य पथकाची भेट

पिंपळा गावास आरोग्य पथकाची भेट

googlenewsNext

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) गावात आतापर्यंत १४ कोरोना रूग्ण आढळून आले असून, तिघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत असल्याने शनिवारी अरोग्य विभागाचे पथक, पं.स. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला.

पिंपळा (बु) गावात कोरोना विषाणूने १५ दिवसांपूर्वी शिरकाव करून थैमान घातले आहे. ११ दिवसांत रूग्णसंख्या १६ वर पोहोचली आहे. सध्या १४ रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यापैकी तिघांचा बळी गेला आहे उर्वरित रुग्णांना शेतातच होम क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय अन्य आजारांनी गावातील ७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे गावकऱ्यांत भीतीचे वातावरण असून, चिंता वाढली आहे. शनिवारी येथील माजी सरपंचाचा कोरोनाने बळी गेल्याने तातडीने शनिवारी तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती रेणुका इंगोले, उपसभापती शरद जमदाडे, बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, पं.स. सदस्य दत्तात्रय शिदे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास सुरवसे आदींनी देऊन उपाययोजनांचा आढावा घेतला, तसेच गावकऱ्यांना कोरोनाचे लक्षण दिसल्यास तत्काळ तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, सरपंच गीता वाघमोडे, उपसरपंच विजय जाधव, ग्रामसेवक दिगबंर कांबळे, डॉ.विकास सुरवसे, आरोग्यसेवक जे.एल. गोप, आनंद शिंदे, भीमा धोतरकर, आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका अरोग्य कर्मचारी आदी होते.

चौकट

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडीसेविका, मदतनीस, शिक्षकांमार्फत गृहभेटी देऊन कुटुंबनिहाय सर्व्हे करून नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्यात आजाराची लक्षणे दिसल्यास अशा व्यक्तीस तत्काळ अरोग्य विभागाकडे पाठविण्यात येत आहे. आतापर्यंत ११० कुटुंबांचा सर्व्हे करण्यात आला असून, उर्वरित सर्व्हे दोन दिवसांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. विकास सुरवसे, वैद्यकीय अधिकारी, काटगांव

Web Title: Health team visits Pimpala village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.