काेविड सेंटरमध्ये आराेग्य कर्मचाऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:33 AM2021-05-09T04:33:35+5:302021-05-09T04:33:35+5:30
कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. अशाच एका कर्मचाऱ्यास उमरगा येथील काेविड सेंटरमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक घटना ...
कोरोनाच्या काळात आरोग्य कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. अशाच एका कर्मचाऱ्यास उमरगा येथील काेविड सेंटरमध्ये मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. या प्रकरणी आराेग्य कर्मचारी आक्रमक झाले असून संबंधिताविरुद्ध कठाेर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उमरगा येथील काेविड सेंटरमध्ये श्रीकांत जाधव हे आराेग्य कर्मचारी म्हणून अतिदक्षता विभागात रात्रपाळीवर कर्तव्य बजावत हाेते. शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ऑक्सिजनचे कारण पुढे करीत संतप्त रुग्णाच्या नातेवाइकांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या शाब्दिक बाचाबाचीचे पर्यवसान मारहाणीत झाली. संबंधित नातेवाइकांनी आराेग्य कर्मचारी जाधव यांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक अशाेक बडे यांचे दालन गाठून निवेदन दिले. मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध कठाेर कारवाई करण्यात यावी. अन्यथा आराेग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.