मुसळधार पावसाने आवक वाढली, माकणी निम्न तेरणा प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडले

By बाबुराव चव्हाण | Published: August 31, 2022 05:45 PM2022-08-31T17:45:31+5:302022-08-31T17:45:58+5:30

वघ्या दाेन तासांत १२७ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याची आवक झपाट्याने वाढली.

Heavy rains increase inflows, 4 gates of Makani Lower Terana Project open | मुसळधार पावसाने आवक वाढली, माकणी निम्न तेरणा प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडले

मुसळधार पावसाने आवक वाढली, माकणी निम्न तेरणा प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडले

googlenewsNext

लोहारा (जि. उस्मानाबाद) : लोहारा शहरासह परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे  माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याची आवक झपाट्याने वाढली. त्यामुळे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता धरणाचे ४ दरवाजे ०.१० मीटरने उचलण्यात आले असून तेरणा नदीपात्रात ४३.३२८ घमी/सेकंद या प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदाही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

लोहारा तालुक्यात सुरवातीला पावसाचा खंड होता. यानंतर काही भागात पाऊस झाला. मागील आठवड्यात पावसाने सर्वदूर एंट्री केली. त्यामुळे माकणी निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याची आवक सुरू हाेती. मागील आठवड्यात धरणातील साठा ८० टक्क्यांवर गेला हाेता. असे असतानाच मंगळवारी सायंकाळच्या सुमारास लोहारा शहरासह परीसरात जोरदार पाऊस झाला. अवघ्या दाेन तासांत १२७ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याची आवक झपाट्याने वाढली. परिणामी बुधवारी सकाळी ६ वाजता प्रकल्पातील पाणीसाठा ११९.७८६ दलघमी होता. त्यात उपयुक्त पाणी साठा ८९.८१९ दलघमी तर पाणी पातळी ६०४.३५ मी. इतकी होती. उपयुक्त पाणीसाठा ९८.४६ टक्के असल्याने सकाळी १०.३० वाजता धरणाचे क्र. १,६,१४ व ९ असे ४ दरवाजे ०.१० मिटरने उचलण्यात आले. त्यामुळे तेरणा नदीपात्रात ४३.३२८ घमी/सेकंद या प्रमाणचे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे धरण सलग दुसर्या वर्षी भरल्याने सिंचनासाेबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...
माकणी निम्न तेरणा प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यापूर्वी म्हणजेच बुधवारी सकाळी लातूर पाटबंधारे विभागाकडून (क्र.१) दूरध्वनी संदेशानंतर तहसीलदार संतोष रुईकर यांनी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. तसेच स्वत: तहसीलदार रुईकर यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली.

Web Title: Heavy rains increase inflows, 4 gates of Makani Lower Terana Project open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.