जागेच्या नोंदीसाठी दोन वर्षांपासून कार्यालयात हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:53+5:302021-09-04T04:38:53+5:30
तुळजापूर येथील नागेश प्रताप पैलवान यांच्या मुलाच्या नावे असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा हद्दीतील गट नंबर ५३८ मधील खुल्या प्लॉट ...
तुळजापूर येथील नागेश प्रताप पैलवान यांच्या मुलाच्या नावे असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा हद्दीतील गट नंबर ५३८ मधील खुल्या प्लॉट मधील १३५ चौ. मी. जागेपैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१च्या चौपदरीकरणात १०० चौ. मी. जागा ही संपादित केली आहे. यातील उर्वरित ३५ चौ. मी. जागेची नोंद घेण्यासाठी मागील दोन वर्षांपासून पैलवान तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु, प्रशासकीय यंत्रणेला घाम फुटला नाही. आजवर ना जागेची नाेंद झाली, ना अन्य ठाेस कार्यवाही. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.
काेट...
जागेच्या नोंदीसाठी प्रशासनाकडे सर्व पुरावे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, नाेंदी घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. सततच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासन हा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्यानेच आता उपाेषण करण्याची वेळ आली आहे.
-नागेश पैलवान, तुळजापूर.