शेती मशागतीततून महिलांच्या हातातील खुरपे झाले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:33 AM2021-07-27T04:33:45+5:302021-07-27T04:33:45+5:30

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगावसह परिसरात खरीप हंगामातील पिकांना शेतकरी खुरपणीऐवजी सर्रास तणनाशक फवारणी करताना दिसत आहेत. यामुळे महिलांच्या ...

The hoe in the hands of women was banished from farming | शेती मशागतीततून महिलांच्या हातातील खुरपे झाले हद्दपार

शेती मशागतीततून महिलांच्या हातातील खुरपे झाले हद्दपार

googlenewsNext

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगावसह परिसरात खरीप हंगामातील पिकांना शेतकरी खुरपणीऐवजी सर्रास तणनाशक फवारणी करताना दिसत आहेत. यामुळे महिलांच्या हातातील खुरपे तर हद्दपार होऊन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला, शिवाय फवारणीमुळे जमिनीचा पोत व मानवी आरोग्यही धोक्यात येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पारगाव कृषी मंडळात शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाला पसंदी देतात. या मंडळाचे भौगोलिक क्षेत्रफळ १९ हजार १३६ हेक्टर असून, यातील १७ हजार ६२० हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. यापैकी १५ हजार ४४४ हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी केली जाते. चालू खरीप हंगामात ११ हजार ६०३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. पूर्वी महिला खुरपणी करून शेतातील पीक जोमदार आणत होत्या. महिना-महिना हे काम चालायचे. यातून महिलांना रोजगार उपलब्ध होत होता. मात्र, आता शेतकरी तणनाशक फवारणीला पसंती देत आहेत. यामुळे महिलांच्या हातातील खुरपे हद्दपार होऊन त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे, शिवाय तणनाशक फवारणीमुळे जमिनीचा पोत बिघडत चालला असून, जमीन नापिक होत आहे. त्याचबरोबर मानवी आरोग्यही धोक्यात आले आहे.

फायदे :-

तणनाशक फवारणीमुळे तणावर नियंत्रण, वेळ व पैशांची बचत, मजूर टंचाईवर मात, यासोबतच रबी हंगामासाठी जास्त मशागतीची आवश्यकता राहत नाही.

दुष्परिणाम : तणनाशक फवारणीमुळे जमिनीचा पोत बिघडणे, औषधांचा खर्च, महिलांच्या रोजगारावर कुऱ्हाड, मानवी आरोग्याला धोका, शिवाय चालू पिकाच्या उत्पन्नावरही परिणाम होतो.

तज्ज्ञ म्हणतात...

शेतकऱ्यांनी शक्यतो आपल्या पिकाला खुरपणी केलेली चांगली. त्यामुळे पिकाची मुळे मोकळी होऊन हवा खेळती राहते व उत्पादनात भर पडते. खुरपणीला मजूर मिळतच नसतील, तर बैलजोडीने कोळपणी करावी. हे दोन्ही पर्याय तणनाशक फवारणीपेक्षा जास्त फायदेशीर आहेत. या उपरही तणाचे प्रमाण जास्त असेल, तर एका पिकात एकदाच तणनाशक फवारावे. तणनाशकाचा अतिवापर जमिनीचे आरोग्य धोक्यात आणू शकतो, शिवाय पिकाची वाढ मंदावते व उत्पादनात घट निर्माण होते.

- संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी वाशी.

Web Title: The hoe in the hands of women was banished from farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.