एका कॉलवर मिळणार घरपोहोच ‘मायेचा घास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:06+5:302021-04-25T04:32:06+5:30

कळंब : मागच्या तीन वर्षांपासून असंख्य गरजवंताची भूख भागविणारा कळंब येथील देवडा फाऊडेशनचा ‘टिफिन’ आता कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या कुटुंबांच्या ...

Homecoming 'Mayacha Ghas' on one call | एका कॉलवर मिळणार घरपोहोच ‘मायेचा घास’

एका कॉलवर मिळणार घरपोहोच ‘मायेचा घास’

googlenewsNext

कळंब : मागच्या तीन वर्षांपासून असंख्य गरजवंताची भूख भागविणारा कळंब येथील देवडा फाऊडेशनचा ‘टिफिन’ आता कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या कुटुंबांच्या मदतीसाठीही सज्ज झाला आहे. होम आयसोलेशन व रुग्णालयात भरती असलेल्या कुटुंबासाठी ‘सिंगल कॉल’ वर हा मायेचा घास पोहोचता करण्यास फाउंडेशनने सुरुवात केली आहे.

कळंब येथील व्यापारी अभय व संजय या देवडा बंधुंनी वडील स्व.विजयकुमार देवडा यांच्या इच्छेनुसार ११ ऑगस्ट, २०१८ मध्ये शहरातील गरजवंतांना मोफत अन्न उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार, सामाजिक बांधिलकी जपत देवडा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी वर्षभर चालणारे ‘किचन’ सुरू केले होते.

या भटारखान्यात दररोज गरमागरम बनलेले जेवण केवळ नाममात्र दरात अनेकांच्या मुखी जात होते. व्यस्त दिनचर्या असतानाही अभय देवडा व संजय देवडा हे बंधू या सेवाकार्यात सातत्य व दर्जा राहील, याची दक्षता घेत असतात. यातूनच मागच्या तीन वर्षांत जवळपास अडीच लाखांवर भाकरी तयार करण्यात आल्या होत्या.

अविरत चाललेला हा सेवायज्ञ गतवर्षी कोरोनामुळे ओढावलेल्या लॉकडाऊनमध्ये कार्यान्वित होता. यंदाही लोकांच्या अडचणी समजून घेत, नियमित झुणका-भाकर सुरू ठेवण्यासोबतच कोरोनाचा स्पर्श झालेल्या कुटुंबांना घरपोच ‘टिफिन’ देण्यास देवडा फाउंडेशनने सुरुवात केली आहे. यासाठी अभय देवडा व संजय देवडा यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Homecoming 'Mayacha Ghas' on one call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.