ठोंबरे जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:39 AM2021-09-08T04:39:39+5:302021-09-08T04:39:39+5:30
साखर, दूध, स्टील, ईथेनाॅल, शेतीमाल साठवणेसाठी ग्रामीण भागात कोल्ड स्टोअरेज, रेशीम धागा निर्मिती प्रकल्प, सीएनजी प्रकल्प, सामाजिक बांधिलकी म्हणून ...
साखर, दूध, स्टील, ईथेनाॅल, शेतीमाल साठवणेसाठी ग्रामीण भागात कोल्ड स्टोअरेज, रेशीम धागा निर्मिती प्रकल्प, सीएनजी प्रकल्प, सामाजिक बांधिलकी म्हणून शैक्षणिक संस्था, ग्रामीण रूग्णालय, पतसंस्था, नॅचरल बझार असे विविध प्रकल्प एकाच छताखाली नैतिकतेने राबवून ते सर्व यशस्वीपणे चालविले आहेत. ठोंबरे यांच्या या कार्याची देशपातळीवर दखल घेऊन कौन्सिल फाॅर फेअर बिझनेस प्रॅक्टिसेसकडून नॅचरल शुगरला जमनालाल बजाज उचित व्यवहार निती पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्णा व जे. के. उद्योग समूहाचे अनंत सिंघानिया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील रांजणीचे सुपुत्र बी. बी. ठोंबरे यांनी ज्ञान, कौशल्य आणि उद्योजकतेचा मातृभूमीसाठी उपयोग करायचा या उद्देशाने दोन दशकांपूर्वी आपले जन्मभूमी रांजणी गावचे उजाड माळरानावर ‘नॅचरल शुगर’ या साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवून त्याचे आज मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर केले. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मचारी यांचा विश्वास संपादन करून साखरे बरोबरच विविध उपपदार्थांची निर्मिती करून शेतकरी व कर्मचाऱ्यांचे हित जोपासले आणि नॅचरल शुगरचा ‘नॅचरल परिवार’ तयार करून परिवारातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित सर्वांना रोजगार उपलब्ध करून देऊन आर्थिक स्थैर्य उपलब्ध करून देण्याचा अटोकाट प्रयत्न केला. नॅचरल परिवाराशी सर्व संबंधितांना आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवनामध्ये स्थिर-स्थावरता आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला. या सर्व कार्यामध्ये प्रामाणिकपणा, सचोटी व नैतिक मूल्यांची जपणूक करूनच संपूर्ण नॅचरल परिवार नैतिक अधिष्ठानावर उभा केला. त्याचीच ही पावती असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.