आदेश झुगारून हाॅटेल सुरू ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:27 AM2021-05-03T04:27:10+5:302021-05-03T04:27:10+5:30

अवैधरित्या गुटखा विक्री, गुन्हा दाखल उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील इंदापूर येथील भिमाशंकर मधुकर माने यांनी आपल्या राहत्या घरी ३ ...

The hotel continued with orders | आदेश झुगारून हाॅटेल सुरू ठेवले

आदेश झुगारून हाॅटेल सुरू ठेवले

googlenewsNext

अवैधरित्या गुटखा विक्री, गुन्हा दाखल

उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील इंदापूर येथील भिमाशंकर मधुकर माने यांनी आपल्या राहत्या घरी ३ हजार ७८० रुरपयांचा गुटखा अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने बाळगला हाेता. ही माहिती मिळताच अन्न सुरक्षा पथकाने छापा मारला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिमाशंकर माने यांच्याविरूद्ध विविध कलमांन्वये वाशी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

शेतजमीन माेजणीवरून मारहाण

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील बाबुराव व सागर बाबुराव लांडगे या दाेघा पिता-पुत्राला गावातीलच सावंत कुटुंबातील मिठू, बालाजी, अर्जुन, धनाजी, प्रमिला, किरण, भिमा, मारूती अशा आठ जणांनी २८ एप्रिल राेजी शेतात जाऊन काठीने बेदम मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी सागर लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २९ एप्रिल राेजी ढाेकी पाेलीस ठाण्यात संबंधितांविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: The hotel continued with orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.