गॅस सिलिंडर पेटल्याने घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:23 AM2021-06-03T04:23:20+5:302021-06-03T04:23:20+5:30
उस्मानाबाद : शहरातील ईदगाह मैदानाच्या मागील वस्तीत स्वयंपाक सुरू असताना गॅस सिलिंडर अचानक पेटल्याने मंगळवारी रात्री दुर्घटना घडली. यामध्ये ...
उस्मानाबाद : शहरातील ईदगाह मैदानाच्या मागील वस्तीत स्वयंपाक सुरू असताना गॅस सिलिंडर अचानक पेटल्याने मंगळवारी रात्री दुर्घटना घडली. यामध्ये राहते घर पूर्णत: खाक झाले असून, आतील संसारोपयोगी साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
उस्मानाबादेतील पिग्मी एजंट वाजीद शेख यांचे ईदगाह मैदानामागे अमीन चौक भागात घर आहे. या घरात मंगळवारी रात्री गॅसवर स्वयंपाक सुरू होता. मात्र, अचानक गळतीमुळे सिलिंडरने पेट घेतला. अचानक भडका उडाल्याने घरातील वाजीद शेख, त्यांचे आई-वडील, पत्नी, दोन मुले सर्वजण घाबरून घराबाहेर पडले. त्यांनी आग शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग जास्त भडकल्याने संपूर्ण घरच कवेत घेतले. या आगीत घरात ठेवलेले पिग्मीचे ४० हजार रुपये, दागिने, संगणक, अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शालेय साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी शेख कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.