बसस्थानकात खासगी वाहनांना प्रवेश मिळतोच कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:26 AM2021-01-02T04:26:40+5:302021-01-02T04:26:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकात खासगी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था आहे. मात्र, बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकात खासगी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था आहे. मात्र, बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नसल्याने रिक्षा, जीप, मालवाहतूक वाहने, दुचाकीस्वार हे बिनदिक्कतपणे बसस्थानकात प्रवेश करत आहेत. खासगी वाहनचालक बसस्थानकातच अस्ताव्यस्तपणे आपली वाहने पार्किंग करतात. त्यामुळे बसचालकांना बसस्थानकात प्रवेश करताना व बाहेर पडताना कसरत करावी लागत आहे.
पार्किंगची व्यवस्था आहे, तरीही वाहने अस्ताव्यस्त?
उस्मानाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकात येणाऱ्या वाहनचालकांना आपली वाहने पार्क करता यावीत, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने वाहनतळाची व्यवस्था केलेली आहे. वाहनतळासाठी आस्थापना नेमण्यात आली आहे. यातून महामंडळाला महिन्यापोटी भाडे मिळते. आस्थापनेकडून वाहनतळात वाहने उभी करण्यासाठी शुल्क निश्चित केलेले आहे. या वाहनतळावरच अनेक वाहनचालक वाहने उभी करतात. जे वाहनचालक वाहनतळाऐवजी बसस्थानकात इतरत्र वाहने उभी करतात, त्यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाते. बसस्थानक फलाट, नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर यापुढेही दंड आकारुन कारवाई केली जाणार आहे.
- पी. एम. पाटील, आगारप्रमुख