पेन्शन परतीच्या नाेटिसीला शेकडाे करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:12+5:302021-05-29T04:25:12+5:30

बालाजी आडसूळ कळंब - शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘पीएम किसान’ योजनेत अपात्र ...

Hundreds of tax-paying farmers are protesting against the return of pension ... | पेन्शन परतीच्या नाेटिसीला शेकडाे करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा...

पेन्शन परतीच्या नाेटिसीला शेकडाे करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा...

googlenewsNext

बालाजी आडसूळ

कळंब - शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या ‘पीएम किसान’ योजनेत अपात्र असतानाही शेतकरी म्हणून लाभ घेतलेल्या व्यक्तींची संख्या हजारापार झाल्याचे समोर आले आहे. यात बहुतांश लाभार्थी ‘करदाते’ असून आता त्यांच्यामागे वसुलीचा ससेमिरा लागला आहे.

आजही असंख्य शेतकरी अल्प उत्पन्न गटात मोडतात. यास्थितीत लहरी निसर्गामुळे बेभरवशाची बनलेली शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक मदतीचा आधार देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली.

यानुसार निकष व अटीमध्ये पात्र असलेल्या प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांची मदत देण्यात येते. प्रत्येकी दोन हजार रुपये, याप्रमाणे तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात येते.

या योजनेतून आजवर मदतीचे आठच्या आसपास हफ्ते जमा करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत झाली असली तरी निकषात बसत नसतानाही अपात्र असलेल्या काही व्यक्तींनी ‘ऑनलाईन’ प्रस्ताव दाखल करत, मदत उचलल्याचे समोर आले होते. यामुळे योजनेच्या अटी व निकषात बसत नसलेल्या, परंतु ऑनलाईन प्रक्रियेतून पात्र ठरत अनुदान उचलणाऱ्या लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाने नोटीस बजावत रक्कम तहसिलदार यांच्या खात्यावर जमा करण्याची तंबी दिली आहे.

चौकट....

आत्तापर्यंत चाळीस लाखापेक्षा जास्त वसुली

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत प्रथमतः अल्प भूधारक शेतकऱ्यांना मदतीचे कवच भेटत होते. यानंतर याची व्याप्ती वाढवण्यात आली. यामुळे तालुक्यात या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली.

तालुक्यात जवळपास ६९ हजार शेतकरी खातेदार आहेत. यापैकी ४२ हजार २६४ शेतकरी या योजनेस पात्र आहेत.

यातील ३९ हजार ३३५ शेतकऱ्यांना सध्या थेट पेन्शनचा लाभ मिळत आहे. यात ९९७ करदाते व विविध कारणांमुळे १९७ शेतकरी अपात्र ठरले आहेत.

त्यांच्याकडून ७४ लाख ६२ हजार रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावण्यात आल्या होत्या. पैकी ४० लाखापेक्षा जास्त रक्कम वसूल झाली आहे.

ते शेतकरी अद्याप प्रतीक्षेत

पात्र ४१ हजार २६४ शेतकऱ्यांपैकी ३९ हजार ३६५ शेतकऱ्यांना सद्या थेट पीएम किसान योजनेच्या आर्थिक मदतीचा लाभ भेटत असला तरी यात दीड हजारावर शेतकरी ‘प्रतीक्षेत’ दिसून येत आहेत. यातील अधिकांश लोकांच्या आधार किंवा इतर तांत्रिक अडचणीवर मार्ग काढणे आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांना पोर्टलवरील तांत्रिक अडचण, कृषि व महसूल कर्मचाऱ्यांचा तिढा यामुळे मदत मिळत नसल्याचे समजते.

आकडेवारी

पीएम किसान पात्र लाभार्थी

४२२६४

थेट मदत मिळत असेलले लाभार्थी

३९३६५

अपात्र असताना पात्र म्हणून लाभ घेतलेले

११९४

वसुलीसाठी नोटीसा दिलेली रक्कम

७६६२०००

आजवर वसुली झालेली रक्कम

४०१३९०८

Web Title: Hundreds of tax-paying farmers are protesting against the return of pension ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.