मीच माझा डाॅक्टर ही संकल्पना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:34 AM2021-05-09T04:34:16+5:302021-05-09T04:34:16+5:30
वाशी-मीच माझा डॉक्टर ही संकल्पना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपल्या गावात राबवावी, असे आवाहन सहाय्यक आराेग्य संचालक डाॅ. एकनाथ माले ...
वाशी-मीच माझा डॉक्टर ही संकल्पना कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपल्या गावात राबवावी, असे आवाहन सहाय्यक आराेग्य संचालक डाॅ. एकनाथ माले यांनी केले.
वाशी येथील काेविड व्हॅन व नाॅन काेविड विभागास त्यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी त्यांच्यासाेबत वैद्यकीय अधीक्षक कपिलदेव पाटील, डॉ़ अमर तानवडे, प्रयोगशाळा सहाय्यक संतोष बुधोडकर, डॉ़ महावीर कोटेचा, डॉ़ संजीवन गरड यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
डाॅ. माले म्हणाले की, ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेले आहेत. त्यामुळे उपचाराअंती जे रुग्ण बरे हाेऊन गावी जातील, त्यांनी काेराेनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. गावातील बंद असलेल्या शाळेत कोरोनामुक्तीचे धडे देण्याचे काम करावे. या कामी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती, शिक्षक आदींनी याेगदान देणे गरजेचे आहे. ऑक्सिजन पातळी वाढविण्यासाठी दरराेज किमान सहा मिनिटे चालून तपासणी करून घ्यावी. कोरोनाची लागण झाल्यानंतर संबंधित रुग्ण घाबरून जातो. मात्र त्यांनी घाबरू नये. कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर काढू नये. जवळ असलेल्या आरोग्य उपकेंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
फाेटाे ओळी..
माजीमंत्री तथा आमदार डाॅ. प्रा. तानाजी सावंत यांनी कोरोना रुग्णाच्या काेविड चाचण्या करण्यासाठी दिलेल्या यंत्रसामग्रीची पाहणी करताना आराेग्य संचालक डाॅ. एकनाथ माले व अन्य.