भूममध्ये मूर्ती प्रतिष्ठापना, कलाशारोहण सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:33 AM2021-09-11T04:33:03+5:302021-09-11T04:33:03+5:30

भूम : येथील समर्थनगर भागात ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात विघ्नहर्ता गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलाशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ...

Idol installation in the ground, art climbing ceremony in excitement | भूममध्ये मूर्ती प्रतिष्ठापना, कलाशारोहण सोहळा उत्साहात

भूममध्ये मूर्ती प्रतिष्ठापना, कलाशारोहण सोहळा उत्साहात

googlenewsNext

भूम : येथील समर्थनगर भागात ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात विघ्नहर्ता गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा व कलाशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पालिका गटनेते संजय गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहरातील समर्थनगर येथील कै. आबासाहेब देशमुख यांनी मंदिर निर्माण करण्यासाठी मालकी हक्काची जागा दिली होती. या जागेवर नव्याने विघ्नहर्ता गणेश मंदिर बांधण्यात आले आहे. यासाठी नगरपालिकेच्या वतीने सभागृहदेखील देण्यात आले आहे. दरम्यान, या ठिकाणी समर्थनगर येथील रहिवाशांनी लोकवर्गणीतून मंदिराचा गाभारा व शिखर बांधकाम पूर्ण केले असून, या ठिकाणी विधिवत मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पार पडला. याच वेळी संजय गाढवे यांच्या पुढाकारातून मंदिर परिसरात वृक्षलागवडही करण्यात आली.

गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याआधी मूर्तीची शहरात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर दिवसभर वेदशास्त्रसंपन्न प्रल्हाद धर्माधिकारी यांच्या मंत्रोच्चाराने होम-हावन, गणेशमूर्तीवर संस्कार करण्यात आले. ९ सप्टेंबर रोजी एकनाथ महाराज तांबोळकर (पाचपिंपळा) यांच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रम पार पडला. यानिमित्त कसबा येथील महादेव मंदिर व राममंदिर येथील भजनी मंडळाचा कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळी हभप अरुण शाळू महाराज, पालिका गटनेते संजय गाढवे, नगरसेवक किरण जाधव, अरुण देशमुख, संतोष देशमुख व समर्थनगर येथील भाविक व रहिवासी उपस्थित होते.

Web Title: Idol installation in the ground, art climbing ceremony in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.