गुलबर्गा येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश, एजंटांमार्फत केला जात असे संपर्क

By बाबुराव चव्हाण | Published: September 15, 2022 04:58 PM2022-09-15T16:58:31+5:302022-09-15T16:59:00+5:30

धक्कादायक-एजन्टाद्वारे उमरगा, लाेहारा परिसरातील गराेदर महिलांचा घेण्यात येत असे शाेध

Illegal fetal diagnosis center exposed in Gulbarga | गुलबर्गा येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश, एजंटांमार्फत केला जात असे संपर्क

गुलबर्गा येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश, एजंटांमार्फत केला जात असे संपर्क

googlenewsNext

उस्मानाबाद - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील गराेदर मातांचे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे बेकायदेशीररित्या गर्भलिंग तपासणी व निदान केले जात असल्याची गाेपनीयन माहिती उस्मानाबादच्या आराेग्य विभागाला मिळाली हाेती. त्यानुसार चाेख ‘प्लॅनिंग’ करून पथकाने गुलबर्गा गाठले. दाेन दिवस तळ ठाेकून ‘डिकाॅय’ गराेदर मातेच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी व निदान करणाऱ्या ‘रॅकेट’चा पर्दाफाश केला. घटनास्थळावरून कुठेही नाेंदणी नसलेले पाेर्टेबल साेनाेग्राफी मशीन व अन्य साहित्य जप्त केले. तसेच संबंधित डाॅक्टरला ताब्यात घेतले असून आळंद येथील एजन्ट मात्र फरार झाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लाेहारा या सीमावर्ती भागातील मुलींच्या जन्माचे प्रमाण मागील काही वर्षांपासून झपाट्याने कमी हाेत आहे. त्यामुळे आराेग्य यंत्रणेची या परिसरात करडी नजर हाेती. असे असतानाच उमरगा व अन्य भागातील गराेदर मातांना कर्नाटक राज्यातील आळंद येथे नेऊन बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी व निदान करण्यात येत असल्याची धक्कादायक तक्रार येथील आराेग्य यंत्रणेकडे ऑनलाईन धडकली. यानंतर वरिष्ठांच्या निर्देशानुसार उमरगा उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम आळंगेकर व विधी सल्लागार ॲड. रेणुका शेटे यांना डिकाॅय गराेदर मातेच्या माध्यमातून स्टिंग ऑपरेशन करण्याचे निर्देश दिले. 

चाेख नियाेजन करून पथकाने डिकाॅय गराेदर मातेद्वारे आळंद येथील एजंटाशी संपर्क केला. ‘‘मुलगा आहे की मुलगी, हे पहायचे आहे. किती पैसे लागतील?’’ अशी विचारणा केली. त्यावर १५ हजार रूपये दर असल्याचे एजन्टाने सांगितले. पंधरा हजार रूपये देण्याचे ठरल्यानंतर कुठे यायचे? अशी विचारणा केल्यानंतर एजन्टाने गुलबर्गा येथे आल्यानंतर सांगताे, असे म्हटले. यानंतर हे पथक डिकाॅय गराेदर मातेला घेऊन गुलबर्गा येथे धडकले. लागलीच एजन्टही तिथे आला.

हा एजन्ट संबंधित डिकाॅय गराेदर महिलेला घेऊन गुलबर्गा येथीलच एका जुन्या खाेलीत घेऊन गेला. पथकाने पाेलीस फाैजफाट्यासह त्याच्या मागाेमाग जावून धडक कारवाई केली. ताेवर एजन्ट पसार झाला. पाेलिसांनी ‘बीएएमएस’धारक डाॅक्टर गुरूराज कुलकर्णी यास ताब्यात घेतले. यानंतर जुन्या कपाटातील कुठेही नाेंदणी नसलेली पाेर्टेबल साेनाेग्राफी मशीन व अन्य साहित्य जप्त केले. संबंधिताविरूद्ध कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती विधी सल्लागार ॲड. रेणुका शेटे यांनी दिली.

Web Title: Illegal fetal diagnosis center exposed in Gulbarga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.