अवैध दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:33 AM2021-05-18T04:33:37+5:302021-05-18T04:33:37+5:30
धोकादायक डीपी (फोटो) उस्मानाबाद : शहरातील काही डीपींचे दरवाजे गायब असून, यातील बहुतांश डीपी या रस्त्यालगत आहेत. यामुळे अपघाताचा ...
धोकादायक डीपी
(फोटो)
उस्मानाबाद : शहरातील काही डीपींचे दरवाजे गायब असून, यातील बहुतांश डीपी या रस्त्यालगत आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तत्काळ सर्व डीपींना दरवाजे बसवून घ्यावेत. तसेच पावसाळ्यापूर्वी इतर दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी होत आहे.
पथदिवे सुरूच
उस्मानाबाद : शहराच्या काही भागातील पथदिवे दिवसाही सुरूच राहत असून, काही भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्व भागांचा सर्व्हे करून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
उपासमारीची वेळ
उस्मानाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले असून, यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना उदरनिर्वाह भागविणेही कठीण झाले आहे. अनेकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर गावात वाढत्या कोरोनामुळे सोमवारपासून जंतूनाशकाची फवारणी सुरू करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस. आर. पांढरे, माधव नांगरे, पवन पाटील, बंटी शित्रे, रमेश राठोड, आनंद कांबळे आदी उपस्थित होते.
‘कुठलाही आजार अंगावर काढू नका’
लोहारा : तालुक्यातील कानेगाव येथे कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. सध्या गावात ३६ कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी कसलाही आजार अंगावर न काढता कुठलाही त्रास होत असल्यास तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी घ्यावी. तसेच जनता कर्फ्यूच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन सरपंच नामदेव लोभे व ग्रामविकास अधिकारी एम. एस. भिल्ल यांनी केले आहे.