अवैधरीत्या दारू विक्री, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:34 AM2021-05-21T04:34:41+5:302021-05-21T04:34:41+5:30

दिंडेगाव येथील शाळेत चाेरी नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखाेलीच्या दरवाजावरील कडी-काेयंडा ताेडून अज्ञातांनी आत ...

Illegal sale of alcohol, filing a crime | अवैधरीत्या दारू विक्री, गुन्हा दाखल

अवैधरीत्या दारू विक्री, गुन्हा दाखल

googlenewsNext

दिंडेगाव येथील शाळेत चाेरी

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखाेलीच्या दरवाजावरील कडी-काेयंडा ताेडून अज्ञातांनी आत प्रवेश केला. यानंतर आतील एलईडी टीव्ही, संगणक, आदी साहित्य चाेरून नेले. ही घटना १६ ते १७ मे या कालावधीत घडली. चाेरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापक विठ्ठल महादेव गायकवाड यांनी नळदुर्ग पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञातांविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

जिल्हा रुग्णालयातून दुचाकी पळविली

उस्मानाबाद : शहरातील जुना बसडेपाे येथील रहिवासी सुनील पांडुरंग निकम यांनी १८ मे राेजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आपली दुचाकी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उभी केली हाेती. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर नसल्याचे समाेर आले. सर्वत्र शाेध घेऊनही दुचाकी मिळाली नाही. त्यामुळे निकम यांनी उस्मानाबाद शहर पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरासमाेरील दुचाकी लांबविली

उस्मानाबाद : शहरातील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी प्रशांत प्रकाश कदम यांनी आपली दुचाकी घरासमाेर उभी केली हाेती. आजूबाजूला काेणीही नसल्याची संधी साधत अज्ञाताने संबंधित दुचाकी लंपास केली. ही घटना दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ मे राेजी समाेर आल्यानंतर सर्वत्र शाेध घेतला. मात्र, दुचाकी मिळून न आल्याने कदम यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.

Web Title: Illegal sale of alcohol, filing a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.