अवैध दारू विक्री, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:34 AM2021-09-03T04:34:40+5:302021-09-03T04:34:40+5:30
रत्नापूर येथे पाेलिसांचा छापा उस्मानाबाद : रत्नापूर येथील एका हाॅटेलनजीक पाेलिसांनी १ सप्टेंबर राेजी छापा मारला. या कारवाईत देशी-विदेशी ...
रत्नापूर येथे पाेलिसांचा छापा
उस्मानाबाद : रत्नापूर येथील एका हाॅटेलनजीक पाेलिसांनी १ सप्टेंबर राेजी छापा मारला. या कारवाईत देशी-विदेशी दारूच्या जवळपास ५६ बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी आंबी ठाण्यात किरण सावंत याच्याविरूद्ध गुन्हा नाेंद करण्यात आला. दरम्यान, साेनारी येथेही रमेश ईटकर यांच्याकडून देशी दारूच्या १५ बाटल्या जप्त केल्या.
मनाई आदेश झुगारून हाॅटेल ठेवले सुरू
उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील आसू येथील जयवंत जयराम जाधव यांनी १ सप्टेंबर राेजी वारदवाडी फाटा येथील आपले हाॅटेल सुरू ठेवले. या वेळी उपस्थितांनी नाका-ताेंडास मास्क न लावल्याचे दिसून आले. या प्रकरणी पाेलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून हाॅटेल चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
न्यायालयाने ठाेठावला ५०० रुपयांचा दंड
उस्मानाबाद : काेविड संदर्भात निष्काळजीपणाचे कृत्य केल्याप्रकरणी रेवण वसंत झिरपे यांच्याविरुद्ध परंडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. त्यांना १ सप्टेंबर राेजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी ५०० रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली.
माेबाइल चाेरट्यास ठाेकल्या बेड्या
उस्मानाबाद : माेबाइल चाेरीस गेल्याप्रकरणी उस्मानाबाद शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पाे.उप.नि. पांडुरंग माने, पाे.ना. हुसेन सय्यद, अमाेल चव्हाण, पाे.काॅ. आरसेवाड, मारलापल्ले, कावरे यांच्या पथकाने उस्मानाबाद शहरातील साठे चाैक भागातील विठ्ठल पवार या २१ वर्षीय तरुणास २ सप्टेंबर राेजी चाेरीच्या माेबाइलसह जेरबंद केले. पुढील तपासासाठी त्यास उस्मानाबाद शहर ठाण्याच्या ताब्यात दिले.