हॉटेल, टपऱ्यांसंदर्भातील निर्णय तात्काळ रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:34 AM2021-04-02T04:34:13+5:302021-04-02T04:34:13+5:30
कळंब वृत्त कळंब... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चहा हॉटेल, पान टपरी हे व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे या व्यावसायिकांसह त्यामध्ये ...
कळंब वृत्त कळंब...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चहा हॉटेल, पान टपरी हे व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे या व्यावसायिकांसह त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याने हा निर्णय ५ एप्रिलपर्यंत रद्द करावा, अन्यथा जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कळंब तालुका भाजपने दिला आहे.
यासंदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली व्यावसायिक व भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. चहा हॉटेल, पान टपरी यांच्यासंदर्भात घेतलेला निर्णय रद्द करावा व कोरोना प्रतिबंधक नियमावलीतील सर्व नियम पाळत हॉटेल व पानपट्टी व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आगामी ५ एप्रिलपर्यंत असे न केल्यास जेलभरो आंदोलन केले जाईल, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, मिनाज शेख, संजय जाधवर, इम्रान मुल्ला, अशोक क्षीरसागर, सुधीर बिक्कड, नादेर शेख, महेश आडणे, रवी निरफळ, अंकुश कांबळे, अझर मोमीन, विशाल वाडे, मोसिन तांबोळी, जुमान चाऊस आदींसह हॉटेल व टपरीचालकही उपस्थित होते.