कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी उपयोजना राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:33 AM2021-05-12T04:33:19+5:302021-05-12T04:33:19+5:30
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. काेराेना संसर्गाची ही चेन ...
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ हाेत आहे. काेराेना संसर्गाची ही चेन ताेडण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, असे आदेश उपविभागीय अधिकारी याेगेश खरमाटे यांनी दिले.
लोकसहभागातून तेर येथे सुरू करण्यात आलेल्या काेराेना विलगीकरण कक्षास मंगळवारी खरमाटे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी येथील साेयीसुविधांची पाहणी केल्यानंतर उपस्थितांना काही सूचनाही केल्या. वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असलेल्या गावातील लाेकांचा शाेध घेऊन तातडीने काेराेना तपासणी केली जावी, आजार कुणालाही अंगावर काढू देऊ नका. त्यांची ताबडताेब काेराेना चाचणी करून उपचारासाठी मदत करावी. काेणी काेराेना मृत्यू लपवित असेल, तर स्थानिकांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. या उपाययाेजनांसाेबतच आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून काेराेनाची चेन ताेडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. साेबतच मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी स्थनिक पातळीवर पदाधिकारी यांच्याशी समन्वय साधून गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना राबविल्या जाव्यात. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनंदा मगरे, सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच मज्जिद मनियार, मंडल अधिकारी अनिल तीर्थकर, तलाठी श्रीधर माळी, अधिपरिचारिका सविता चाकाटे, ग्रामविकास अधिकारी नवनाथ पवार आदी उपस्थित हाेते.