माउली प्रतिष्ठानच्या कोविड सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:53+5:302021-04-28T04:34:53+5:30
: जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेल्या मंजुरीनंतर उमरगा येथील माउली प्रतिष्ठानच्या वतीने न्यू बालाजी नगर येथील आईसाहेब मंगल कार्यालयात ...
: जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेल्या मंजुरीनंतर उमरगा येथील माउली प्रतिष्ठानच्या वतीने न्यू बालाजी नगर येथील आईसाहेब मंगल कार्यालयात ६० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर मंगळवारी सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन प्रतिभा गिरीश सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी तहसीलदार संजय पवार, वैद्यकीय अधीक्षक अशोक बडे, डॉ. विक्रम आळंगेकर, तालुका आरोग्य अधिकारी सुहास साळुंके, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, माउली प्रतिष्ठानचे संस्थापक उमाकांत माने, माधव पवार, डॉ. अभिजित जगताप, बप्पा हराळकर, गिरीश सूर्यवंशी, बळी सुरवसे, बापू बिराजदार, नितीन होळे, अनिल बिराजदार, अभिषेक पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. हे सेंटर कुठल्याही शासकीय मदतीविना चालणार असून, एक वैद्यकीय पथक कायमस्वरूपी कार्यरत राहणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमाकांत माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. अशोक बडे यांच्या हस्ते मागील दीड वर्ष कोरोना काळात सामाजिक कार्य करणारे विजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक सिद्धेश्वर माने तर सूत्रसंचालन प्रवीण स्वामी यांनी केले. आभार सचिन सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमासाठी आकाश चव्हाण, राहुल सुरवसे, स्वप्निल सोनकवडे, प्रसन्ना पुदाले, सिद्धू दुधभाते, दीपक काळे, प्रथमेश राऊत, मितेश राखेलकर आदींनी पुढाकार घेतला.