मराठा समाजाचा सरसकट ‘ओबीसी’मध्ये समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:32 AM2021-05-26T04:32:40+5:302021-05-26T04:32:40+5:30
उमरगा - मराठा समाजाचा सरसकट ‘ओबीसी’मध्ये समावेश करावा, अशी मागणी उमरगा तालुका संभाजी ब्रिगेडतर्फे मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात ...
उमरगा - मराठा समाजाचा सरसकट ‘ओबीसी’मध्ये समावेश करावा, अशी मागणी उमरगा तालुका संभाजी ब्रिगेडतर्फे मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संभाजी ब्रिगेड तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रभर जागतिक कीर्तीचे अनेक मोर्चे काढले. मराठा समाज महाराष्ट्रातच अनेक ठिकाणी ‘ओबीसी’मध्ये समाविष्ट आहे. त्यांच्या जातीच्या ठिकाणी कुणबी मराठा असा उल्लेख करून ठेवला आहे. त्यामुळे विदर्भ व अनेक ठिकाणी सगेसोयरे नातेवाईकांचा कुणबी मराठा म्हणून ओबीसीमध्ये समावेश आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट ‘ओबीसी’मध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी खेडेकर गेल्या कित्येक वर्षापासून करत आहेत. खेडेकर यांच्या गेल्या कित्येक वर्षाच्या मराठा आरक्षणावर केलेल्या अभ्यासाचा विचार करून महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचा सरसकट ‘ओबीसी’मध्ये समावेश करावा, अशी मागणी उमरगा तालुका संभाजी ब्रिगेड तर्फे उमरगा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष प्रदीप जाधव, सचिव दादासाहेब बिराजदार, उमरगा शहराध्यक्ष विशाल माने, ॲड. शितल चव्हाण, रमेश जोगे आदींच्या सह्या आहेत.