रस्ते कामांची गुणवत्ता वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:25 AM2021-07-17T04:25:53+5:302021-07-17T04:25:53+5:30

ओम राजेनिंबाळकर : दिशा समितीची बैठक उस्मानाबाद : प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जिल्ह्यातील चालू असलेल्या रस्त्याची गुणवत्ता वाढवून पथकाद्वारे ...

Increase the quality of road works | रस्ते कामांची गुणवत्ता वाढवा

रस्ते कामांची गुणवत्ता वाढवा

googlenewsNext

ओम राजेनिंबाळकर : दिशा समितीची बैठक

उस्मानाबाद : प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जिल्ह्यातील चालू असलेल्या रस्त्याची गुणवत्ता वाढवून पथकाद्वारे पाहणी करावी तसेच पाच वर्षे देखभाल दुरुस्ती असलेले रस्ते दुरुस्त करावेत, अशा सूचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रशासनाला दिल्या.

येथील जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय दिशा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. खा. राजेनिंबाळकर म्हणाले, प्रत्येक गावात निराधार लाभार्थ्यांचे सर्व्हे करून त्यांना न्याय द्यावा. जिल्हा बँकेने निराधारांच्या पगारी विनाविलंब वाटप कराव्यात. १५ ऑगस्टपर्यंत शासनांच्या योजनांची माहिती दर्शनीभागावर लावावी. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत केलेल्या कामाचे मस्टर काढण्यास दिरंगाई करू नये. शेतकऱ्यांचे शेत रस्ते मोकळे करण्याची मोहीम या योजनेमधून करावी. प्रत्येक गावात किमान २ कामे चालू ठेवावीत. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी प्रत्येकी १-१ काम चालू करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, दिशा समिती सदस्य कांचनमाला संगवे, नगसेवक गटनेते तथा नगसेवक सोमनाथ गुरव आदी दिशा समितीचे सर्व सदस्य तसेच जिल्हास्तरीय सर्व योजनेचे अधिकारी उपस्थित होते.

चौकट..........

‘त्या’ कंत्राटदारांना नवी कामे देऊ नका

रेल्वे विभागामार्फत जे साईट रस्ते केले आहेत, त्या रस्त्यांची दुरुस्ती करावी. प्रामुख्याने भिकारसारोळा, खामगाव, बुकणवाडी येथील रस्ते दुरुस्त करावेत. वेगवेगळ्या विभागातील ज्या कंत्राटदाराकडे पहिली कामे प्रलंबित आहेत, त्यांना नवीन कामे देऊ नये. उलट अशा कंत्राटदाराचा ब्लॅकलिस्ट प्रस्ताव पाठवावा तसेच मागील बैठकीला गैरहजर असलेले व अनुपालन अहवाल सादर न केलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवावा.

Web Title: Increase the quality of road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.