निधीबाबत चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:32 AM2021-04-25T04:32:13+5:302021-04-25T04:32:13+5:30
पेठसांगवी : उमरगा तालुक्यातील मातोळा गावापासून बोरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ३ लाखांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, हेकाम न ...
पेठसांगवी : उमरगा तालुक्यातील मातोळा गावापासून बोरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ३ लाखांचा निधी मंजूर झाला होता. परंतु, हेकाम न करता बिल उचलल्याची तक्रार करीत याच्या चौकशीची मागणी काही ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
श्वानांना आवरा
कळंब : शहरात मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ही कुत्रे घोळक्याने थांबत असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांच्या अंगावर ते धाऊन जात आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढल्याने या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
कार्यवाहीची मागणी
उस्मानाबाद : शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या राहत असून, काही भागातील डीपी हाताला पोहोचतील, एवढ्या उंचीवर आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढल्याने याबाबत कार्यवाहीची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
सुविधांकडे दुर्लक्ष
उमरगा : शहरातील वाढीव वस्ती भागात अनेक ठिकाणी रस्ते, वीज आदी मूलभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांना गैरसोईचा सामना करावा लागत असून, पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.