शिबिरात २०० ग्रामस्थांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:25 AM2020-12-25T04:25:56+5:302020-12-25T04:25:56+5:30

लोहारा : तालुक्यातील वाडी वडगाव येथील श्री महादेव मंदिरात सेवावर्धिनी सामाजिक संस्था पुणे व सिमेन्स गमेसा यांच्या संयुक्त विद्यमाने ...

Inspection of 200 villagers in the camp | शिबिरात २०० ग्रामस्थांची तपासणी

शिबिरात २०० ग्रामस्थांची तपासणी

googlenewsNext

लोहारा : तालुक्यातील वाडी वडगाव येथील श्री महादेव मंदिरात सेवावर्धिनी सामाजिक संस्था पुणे व सिमेन्स गमेसा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबीर घेण्यात आले. यात २०० ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. सदस्य गुंडाप्पा भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच वनमाला भुजबळ, माजी सरपंच हरिदास गिराम, ग्रा. पं. सदस्य दगडू गिराम, सुप्रिया गिराम, नागनाथ गिराम, बोडके, निंगप्पा भुजबळ, आशा कार्यकर्ती चंद्रकला बादुले, अंगणवाडी सेविका अनिता गिराम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी २०० नागरीकांचे रक्तगट, हिमोग्लोबीन, डोळे तपासणी, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी या तपासण्या करण्यात आल्या. ही तपासणी सोलापूर येथील डॉ. प्रमोद कसबे, सेवावर्धिनी समन्वयक आण्णासाहेब तरंगे, सखी कार्यकर्ती शैला गिराम आदींनी केली. प्रास्ताविक दयानंद भुजबळ यांनी केले.

Web Title: Inspection of 200 villagers in the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.