बाणगंगा कारखान्याच्या विस्तारीकरणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:09 AM2021-09-02T05:09:54+5:302021-09-02T05:09:54+5:30

भूम-परंडा-वाशी विधानसभा क्षेत्रात अनेक सिंचन प्रकल्प व तलाव असल्यामुळे तसेच गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असल्याने ...

Inspection of expansion of Banganga factory | बाणगंगा कारखान्याच्या विस्तारीकरणाची पाहणी

बाणगंगा कारखान्याच्या विस्तारीकरणाची पाहणी

googlenewsNext

भूम-परंडा-वाशी विधानसभा क्षेत्रात अनेक सिंचन प्रकल्प व तलाव असल्यामुळे तसेच गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असल्याने ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी संचालक मंडळाने बाणगंगा कारखान्याचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी बाणगंगाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाला पाहिजे, यासाठी नियोजन केलेले आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक रणवरे, इन्चार्ज संतोषकुमार तोंडले, चीफ इंजिनिअर शिंदे यांना काम लवकर करून कारखाना लवकर चालू करावा, याबाबत सूचना देण्यात आल्या.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष महादेव खैरे, कार्यकारी संचालक रणवरे, चीफ केमिस्ट संतोषकुमार तोंडले, चीफ इंजिनिअर शिंदे, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Inspection of expansion of Banganga factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.