चाैकीच्या कामांची पाेलीस अधीक्षकांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:43 AM2021-02-27T04:43:29+5:302021-02-27T04:43:29+5:30
येरमाळा : येथील श्री येडेश्वरी मंदिरास पाेलीस अधीक्षक राज तिलक राैशन यांनी भेट देऊन पार्किंग व्यवस्थेचे काम तसेच मंदिर ...
येरमाळा : येथील श्री येडेश्वरी मंदिरास पाेलीस अधीक्षक राज तिलक राैशन यांनी भेट देऊन पार्किंग व्यवस्थेचे काम तसेच मंदिर परिसरात हाेत असलेल्या नवीन पाेलीस चाैकीच्या कामाची पाहणी केली.
पाेलीस अधीक्षक राैशन यांनी २५ फेब्रुवारी राेजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येरमाळा पाेलीस ठाण्यास भेट दिली. येथील शासकीय कामकाज आटोपून त्यांनी एपीआय गणेश मुंढे यांच्यासह मंदिर परिसराची पाहणी केली. यानंतर पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या चाैकीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी चाेवीस तास कर्मचारी तैनात राहणार आहेत. एवढेच नव्हे तर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येत आहेत. उपराेक्त सर्व उपाययाेजनांची पाहणी केल्यानंतर त्यांनी काही सूचनाही केल्या. देवस्थानचे अध्यक्ष बापू बेदरे, राजाभाऊ बेदरे, संजय आगलावे, माजी सरपंच विकास बारकुल, अनिल पाटील, सुनील पाटील, विजय देशमुख, संतोष आगलावे, सूर्यकांत बेदरे, गणेश बेदरे आदींची उपस्थिती हाेती.