उस्मानाबादेत ७० ठिकाणी विद्युत पाेल बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:28 AM2020-12-24T04:28:28+5:302020-12-24T04:28:28+5:30
उस्मानाबाद शहराचा विस्तार हाेत असल्याने रस्ते, नाल्यांसाेबतच वीज कनेक्शनसाठी विद्युत खांब उभारण्याची मागणी पालिकेकडे येत आहे. विद्युतखांब उभारणीच्या मागणीत ...
उस्मानाबाद शहराचा विस्तार हाेत असल्याने रस्ते, नाल्यांसाेबतच वीज कनेक्शनसाठी विद्युत खांब उभारण्याची मागणी पालिकेकडे येत आहे. विद्युतखांब उभारणीच्या मागणीत दिवसागणिक वाढ हाेत असल्याने पालिकेकडून सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यानुसार शहरातील थाेडेथाेडके नव्हे तब्बल ७० ठिकाणी नव्याने विद्युत खांब उभारण्याची गरज आहे. यापैकी काही ठिकाणी एक, काही ठिकाणी दाेन तर काही ठिकाणी १० ते १६ विद्युतखांब उभारावे लागत आहेत. याच अनुषंगाने नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी २३ डिसेंबर राेजी वीज महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंत्यांना पत्र दिले आहे. पत्रात तब्बल ७० स्पाॅट नमूद करण्यात आले आहेत. काेणत्या ठिकाणी किती विद्युत खांबांची गरज आहे, हेही त्यात नमूद केले आहे. त्यामुळे आता महावितरण किती दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरूवात करते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
चाैकट...
काही पाेल शिफ्ट करावे लागणार...
उस्मानाबाद शहरातील काही भागातील पाेल शिफ्ट करावे लागणार आहेत. काही ठिकाणी तारा ओढाव्या लागतील. या कामांचाही नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे.
काेट...
नवीन पाेल उभारण्याची गरज आहे. महावितरणला अशा ७० ठिकाणांची यादी दिली आहे. त्यामुळे एकीकृत ऊर्जा विकास याेजनेच्या माध्यमातून महावितरणने नवीन पाेल बसवून द्यावेत.
-मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद.