नियमित तपासणीवर भर देण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:35 AM2021-05-20T04:35:42+5:302021-05-20T04:35:42+5:30

यावेळी त्यांच्यासमवेत लातूर विभागाचे आरोग्य सहसंचालक डॉ. एकनाथ माले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ ...

Instructions for emphasizing regular inspections | नियमित तपासणीवर भर देण्याच्या सूचना

नियमित तपासणीवर भर देण्याच्या सूचना

googlenewsNext

यावेळी त्यांच्यासमवेत लातूर विभागाचे आरोग्य सहसंचालक डॉ. एकनाथ माले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीपकुमार जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ नितिन शिंदे, उपसरपंच नामदेव कोकाटे यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. पाटील यांनी आशाताई सुरेखा पांडुरंग हजारे, छाया कोल्हे यांच्याशी संवाद साधत हावरगाव येथील लोकसंख्या, दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या, सध्या उपचारावर असलेले रुग्ण याची माहिती जाणून घेतली. शिवाय बालकांचे लसीकरण, माता बाल आरोग्य कार्यक्रम आदी नियमित व नॉन कोविड विषयवार कामकाज कसे होते, याची माहिती जाणून घेतली.

याशिवाय डॉ. नितीन शिंदे यांच्याकडे कंटेन्टमेंट झोन, निर्जंतुकीकरण, ट्रेसिंग यासंदर्भात माहिती घेतली. यावेळी पोलीस पाटील दत्तात्रय कोल्हे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी आशाताईंना तापमान कसे मोजतात, ऑक्सिजन पातळी किती योग्य आहे, याची माहिती आहे का, याची खातरजमा केली. डॉ. शिंदे यांनी दररोज सर्वेक्षण होते का, याची चौकशी केली व बाधितांच्या घरातील इतर लोकांच्या स्क्रिनिंगवर भर द्यावा, असे सूचित केले.

Web Title: Instructions for emphasizing regular inspections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.