ऊसताेडणीवरून महिलेस शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:48 AM2021-02-23T04:48:56+5:302021-02-23T04:48:56+5:30
उस्मानाबाद - ऊसताेडणीस विराेध करून महिलेस शिवीगाळ केली. ही घटना परंडा तालुक्यातील नालगाव शिवारात घडली. या प्रकरणी परंडा पाेलीस ...
उस्मानाबाद - ऊसताेडणीस विराेध करून महिलेस शिवीगाळ केली. ही घटना परंडा तालुक्यातील नालगाव शिवारात घडली. या प्रकरणी परंडा पाेलीस ठाण्यात दाेघांविरुद्ध २० फेब्रुवारी राेजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, परंडा तालुक्यातील नालगाव येथील वनिता विलास काळे या मुलगा, सून यांना साेबत घेऊन ऊसताेडणी कामगारांसाेबत आपल्या शेतात गेल्या हाेत्या. यावेळी त्यांचा दीर अविनाश काळे व त्यांचा मित्र किरण पाटील यांनी शेतात जाऊन ‘मला पाच ते सहा लाख रुपये द्या. नाही तर उसात अर्धा हिस्सा द्या. त्याशिवाय मी तुम्हाला ऊस ताेडू देणार नाही,’ अशी धमकी दिली. तसेच ऊसताेड कामगारांना शिवीगाळ केली. त्यामुळे हे कामगार निघून गेले. यानंतर ९ फेब्रुवारी राेजी पुन्हा ऊसताेडणी सुरू झाली असता नमूद दाेघांनी पुन्हा शेतात जाऊन अडवणूक व शिवीगाळ केली. या प्रकरणी वनिता कराळे यांच्या फिर्यादीवरून २० फेब्रुवारी राेजी परांडा पाेलीस ठाण्यात भादंसंचे कलम ३८४, ३४१, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा नाेंद करण्यात आला आहे.