८१ शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:32 AM2021-03-16T04:32:10+5:302021-03-16T04:32:10+5:30

उस्मानाबाद : राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२०-२१ अंतर्गत अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरींचा लाभ देण्यासाठी ...

Irrigation wells sanctioned to 81 farmers | ८१ शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर

८१ शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मंजूर

googlenewsNext

उस्मानाबाद : राष्ट्रीय कृषी विकास योजना २०२०-२१ अंतर्गत अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरींचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवरुन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यातील लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या ८१ शेतकऱ्यांच्या यादीस जिल्हास्तरीय निवड समितीने मान्यता दिली आहे.

जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय निवड समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली समितीची ही बैठक पार पडली. यावेळी तालुकानिहाय लक्षांकानुसार प्राप्त झालेल्या महाडीबीटी पोर्टलवरील निवड यादीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमधील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या लाभार्थीनांच योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत नवीन सिंचन विहिर या बाबीसाठी दोन लाख पन्नास हजार रुपये या उच्चतम मर्यादेत अनुदान देण्यात येते.

या बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी व्ही.व्ही. जोशी, सर्वेक्षक भूजल यंत्रणेचे श्री. काळे, तंत्र अधिकारी श्री. मंगरुळे, अदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रतिनिधी दिवाने, कृषी विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमनशेटे, जिल्हा कृषी अधिकारी (विघयो) पी. जी. राठोड आणि पंचायत समिती कृषी अधिकारी (विघयो) आदी उपस्थित होते. लाभार्थी निवड यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

चौकट.....

कामे तत्काळ सुरू करा

लॉटरी पध्दतीने निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये उस्मानाबाद तालुक्यातील १२, तुळजापुरातील १५, उमरगा १०, लोहारा ९, कळंब १३, वाशी ५, भूम ८ परंडा तालुक्यातील ९ अशा ८१ लाभार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या आणि योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमधील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनी नवीन सिंचन विहिरींची कामे तत्काळ सुरू करावीत, असे आवाहन कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, कृषी विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमनशेटे यांनी केले आहे.

Web Title: Irrigation wells sanctioned to 81 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.