तुराेरीत २० बेडचे आयसाेलेशन सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:48+5:302021-05-13T04:32:48+5:30
उमरगा : तालुक्यातील तुरोरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामपंचायत, शिवसेना व युवासेना यांच्या ...
उमरगा : तालुक्यातील तुरोरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्रामपंचायत, शिवसेना व युवासेना यांच्या पुढाकारातून विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षाचे उद्घाटन बुधवारी आमदार ज्ञानराज चौगुले व युवा सेनेचे किरण गायकवाड यांच्या उपस्थितीत सरपंच मयुरी जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, माजी उपसभापती युवराज दाजी जाधव, उपसरपंच तुकाराम भय्या जाधव, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, डॉ. विजयकुमार शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य मारुती थोरे, शाखा प्रमुख विजयकुमार भोसले, ग्रामविकास अधिकारी एस. एस. कांबळे, पोलीस पाटील प्रशांत पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर जाधव, साठे, आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. शिल्पा सपली, आरोग्य कर्मचारी गणेश सुगावे, विजया कोळी, शिक्षक ज्ञानेश्वर जाधव, मंगेश उके यांच्यासह शिवाजी माडीवाले, तुकाराम मंमाळे, रमेश पवार आदींची उपस्थिती होती. ग्रामीण भागात वाढणारा कोरोनाचा संसर्ग व धोका लक्षात घेऊन युवा सेनेचे किरण गायकवाड यांनी २० बेड उपलब्ध करून दिले आहेत. इतर सुविधा ग्रामपंचायतीच्या वतीने पुरवण्यात येणार आहेत. याप्रसंगी थोरे यांनी आगामी काळात आणखी सुविधा व आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.